मुंबई: याचं अचानक निघून जाणं सर्वांच्याच मनाला चटका लावून जाणारं होतं. सुशांतचा हा शेवटचा सिनेमा असल्यानं; 'दिल बेचारा'कडं सर्वांचेचे डोळे लागून राहिले होते. हा सिनेमा पाहिल्यावर नक्कीच प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आल्या शिवाय राहणार नाही. सुशांतची एक्स गर्लफ्रेंड ही देखील त्याचा हा अखेरचा चित्रपट पाहण्यावाचून स्वत:ला रोखू शकली नाही. सुशांतच्या अखेरच्या चित्रपटाबद्दल तिनं एक पोस्ट शेअर करत भावना व्यक्त केल्या आहेत. पवित्र रिश्ता ते दिल बेचारा...! एकदा शेवटचं....असं तिनं तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. अंकितानं ही पोस्ट शेअर केल्यानंतर चाहत्यांनी देखील अंकिताला धीर देण्याचा प्रयत्न केलाय. सुशांतच्या निधनानंतर अंकिता मनानं खचली असल्याचं पाहायला मिळतंय. सुशांतच्या निधनापूर्वीची अंकिता आणि सध्याची अंकिता याच्यात खूपच फरक असल्याचं चाहते म्हणतातयत. सतत सोशल मीडियावर काही तरी पोस्ट करणारी अंकिता अचानक आता गप्प झाली. तिनं गेल्या महिन्यापासून तीन पोस्ट शेअर केल्या, त्या देखील सुशांतसाठीच आहेत. त्यामुळं तिला या धक्क्यातून सावरण्यासाठी आणखी वेळ हवा आहे, असं तिच्या जवळच्या मैत्रिणीनं म्हटलं आहे. 'पवित्र रिश्ता' 'पवित्र रिश्ता' या मालिकेत सुशांत आणि अंकिता एकत्र काम करत होते. त्यानंतर सुशांतनं मालिका सोडली आणि तो बॉलिवूडमध्ये गेला. तिथं स्थिरावण्यासाठी त्यानं जोरदार प्रयत्न सुरू केले. या दरम्यानच दोघांनी प्रेमाची कबुली दिली होती. त्यानंतर २०११मध्ये एका डान्सरिअॅलिटी शोमध्ये सुशांतनं अंकिताला मागणी घातली होती. तिनंही त्याला होकार दिला. आपण लवकरच लग्न करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. पण काही दिवसानंतर एका पार्टीमध्ये अंकितानं सुशांतला एक सणसणीत थोबाडीत दिल्याच्या बातम्यांनी मध्ये खळबळ उडवून दिली होती. पण त्यानंतर दोघांनीही या घटनेचा इन्कार केला होता‘आमच्यात असं काही झालेलंच नाही. आम्ही पूर्वीसारखेच एकमेकांच्या गाढ प्रेमात आहोत. आमच्याविषयी असं काहीतरी छापणाऱ्या लोकांची तर आम्हाला कीवच येते.’असं या दोघांचं म्हणणं होतं. पण काही दिवसांतच त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, 'दिल बेचारा' चित्रपट मे महिन्यातच प्रदर्शित होणार होता. मात्र लॉकडाउनमुळं आणि पोस्ट प्रोडक्शनचं काम बाकी असल्याचं सांगत या चित्रपटाचं प्रदर्शन बऱ्याचदा पुढं ढकलण्यात आलं होतं. हा चित्रपट सिनेमागृहातच रिलीज करण्यात यावा अशी आग्रही मागणी चाहत्यांकडून करण्यात करण्यात येत होती. २०१४ साली आलेल्या हॉलिवूडच्या 'द फॉल्ट इन अवर स्टार' या चित्रपटाचा 'दिल बेचारा' हा चित्रपट रिमेक आहे. सुशांतचा ‘दिल बेचारा’ ही एक प्रेमकथा असून, त्यात त्याची नायिका आहे. अभिनेता यानं देखील या चित्रपटात एक महत्त्वाची भूमिका साकारली आहे. तर सुशांतचा मित्र आणि दिग्दर्शक मुकेश छाबडा यानंन हा चित्रपट दिग्दर्शित केलाय. जॉन ग्रीनच्या कादंबरीवर हा चित्रपट बेतलेला आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2BuFioJ