० प्राइम टाइममधल्या व्ह्यूअरशिपमध्ये १८ टक्क्यांनी घट ० नॉन प्रेक्षकसंख्येत १०८ टक्क्यांनी वाढ मुंबई टाइम्स टीम कोव्हिड संकटाच्या काळामध्ये टीव्ही व्ह्यूअरशिपची गणितं पूर्णपणे बदलली असल्याचं दिसून येतंय. सर्वाधिक प्रेक्षकसंख्या मिळणाऱ्या 'प्राइम टाइम'मध्ये टीव्ही पाहणाऱ्यांची संख्या, टाइमच्या वेळेच्या तुलनेत कमी झाली आहे. तर दुसरीकडे प्राइम टाइम सोडून इतर वेळेत टीव्ही पाहणाऱ्या प्रेक्षकांच्या संख्येत मात्र वाढ झाली आहे. छोट्या पडद्यावरचा प्राइम टाइम म्हणजे संध्याकाळी ६ वाजल्यापासून ते रात्रौ १२ वाजेपर्यंत काळ मानला जातो. याच वेळेत घरोघरी सर्वाधिक टीव्ही पाहिला जातो. परंतु, लॉकडाउनच्या दिवसात प्राइम टाइमचं हे चित्र पूर्णपणे बदललं आहे. लॉकडाउनमुळे गेल्या साडेतीन महिन्यांपासून लोक दिवसभर घरी आहेत. त्यामुळे प्राइम टाइमच्या वेळेत टीव्हीवर कार्यक्रम पाहणं कमी झालं असून, 'नॉन प्राइम टाइम'च्या वेळेत टीव्ही पाहण्याचं प्रमाण मात्र वाढलं आहे. टीव्हीवर सध्या सर्वाधिक काय पाहतात? किती वेळ टीव्ही पाहतात हे जाणून घेण्यासाठी 'बार्क', अर्थात 'ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिल' आणि नेल्सन यांनी संयुक्तपणे एक अहवाल सादर केला आहे. यानुसार 'नॉन प्राइम टाइम' हा 'प्राइम टाइम'पेक्षा हिट ठरतोय. हिंदी जीईसी, अर्थात जनरल एंटरटेनमेंट चॅनल, ज्यात टीव्ही मालिका प्रक्षेपित करणाऱ्या वाहिन्यांचा समावेश होतो. लॉकडाउनच्या काळात वेळेत त्या वाहिन्या अधिक पाहिल्या गेल्या आहेत. पूर्ण दिवसाच्या व्ह्यूअरशिपमध्ये २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. नॉन प्राइम टाइम वेळेतल्या प्रेक्षकसंख्येत तब्बल १०८ टक्क्यांनी वाढ झाली असून, दुसरीकडे प्राइम टाइम वेळेत व्ह्यूअरशिपमध्ये १८ टक्क्यांनी घट झाली आहे. वाहिन्यांचे प्रकार - पूर्ण दिवस - नॉन प्राइम टाइम (सका. ६ वा. ते संध्या. ६ वा.) - प्राइम टाइम (संध्या. ६ वा. ते रात्रौ. १२ वा.) सर्व वाहिन्या १५% ४३% १०% हिंदी जीईसी (जनरल एंटरटेनमेंट चॅनल) २५% १०८% १८% हिंदी सिनेमा २४% ५९% १% म्युझिक, युथ वाहिन्या १७% १३% २६% किड्स ५०% ६७% १७% जीईसी (जनरल एंटरटेनमेंट चॅनल) ८% २६% १८% इंग्रजी सिनेमा ७०% ८०% ५७% खेळ - ७९% ७७% ८२% पाहिला गेलेला टीव्ही २०१९ची पहिली सहामाही (जानेवारी-जून) जीईसी ४९% सिनेमा २३% वृत्त वाहिन्या ९% किड्स ६% खेळ ४% इत्यादी ९% २०२०ची पहिली सहामाही (जानेवारी-जून) जिईसी ४६% सिनेमा २५% वृत्त वाहिन्या १२% किड्स ८% खेळ १% इत्यादी ८% वाहिन्यांची संख्या वृत्त वाहिन्या १९८ जिईसी १६० सिनेमा १११ खेळ ३१ किड्स १९ इत्यादी १३१
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/325wFvE