Full Width(True/False)

एका सिनेमासाठी कमल हासन घेतात एवढे कोटी

चेन्नई- दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सुपरस्टार म्हणून यांच्याकडे पाहिलं जातं. फक्त सिनेमाच नाही तर राजकीय आणि सामाजिक पातळीवरही कमल यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. आयुष्यात आलेल्या प्रत्येक संकटांचा सामना करत, अथक परिश्रमांनी त्यांनी स्वतःचं स्थान पक्क केलं आहे. ते उत्कृष्ट अभिनेते तर आहेतच शिवाय ते उत्तम दिग्दर्शक, लेखक, गायकही आहेत. त्यांनी भरतनाट्यमचं शास्त्रोक्त शिक्षण घेतलं आहे. राजकमल इण्टरनॅशनल कंपनीचे ते मालकही आहेत. याशिवाय ते एका सिनेमात काम करण्याचे जवळपास ३० कोटी रुपये घेतात. याशिवाय सिनेमाच्या प्रॉफिटमध्येही त्यांची भागीदारी असते. त्यांची एकूण संपत्ती जवळपास ७०० कोटींच्या घरात जाणारी आहे. कमल यांनी बालकलाकार म्हणून सिनेसृष्टीत काम करायला सुरुवात केली. 'कलाथुर कन्नमा' हा त्यांचा पहिला सिनेमा होता. या सिनेमासाठी त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते सुवर्ण पदकही मिळालं होतं. १९७८ मध्ये हासन यांनी वाणी गणपती यांच्याशी विवाह केला. वाणी या कमल यांच्यापेक्षा २४ वर्षांनी मोठ्या होत्या. १० वर्षांच्या संसारानंतर त्यांनी १९८८ मध्ये घटस्फोट घेतला. याच काळात ठाकूर आणि कमल हासन यांची भेट झाली. सारिकामुळे कमल यांचं लग्न मोडलं असंही म्हटलं जातं. कमल आणि सारिका एकमेकांना डेट करू लागले. दरम्यानच्या काळात सारिका गरोदर राहिल्या. ही गोष्ट जेव्हा वाणी यांना कळली तेव्हा त्यांनी कमल यांना घटस्फोट दिला. घटस्फोटानंतर त्याचवर्षी कमल यांनी सारिकाशी लग्न केलं. लग्नानंतर सारिकाने पहिल्या मुलीला श्रुती हासनला जन्म दिला. लग्नानंतर सारिका यांना सिनेमांमध्ये फार काम केलं नाही. १९९१ मध्ये दोघांना अजून एक मुलगी झाली. .. सुखी संसारात तेव्हा वादळ आलं जेव्हा कमल त्यांच्याहून २२ वर्ष लहान सिमरन बग्गाला डेट करू लागले. सारिकाला ही गोष्ट कळल्यानंतर त्यांनी २००४ मध्ये कमल यांना घटस्फोट दिला. मात्र याबद्दल कळताच सिमरन यांनी त्यांच्या लहानपणीच्या मित्राशी लग्न केलं. यानंतर कमल पूर्णपणे एकटे पडले. अनेक वर्षांनंतर त्यांची ओळख गौतमी तडीमल्लाशी झाली. १२ वर्ष दोघं लिव्ह- इन रिलेशनशिपमध्ये होते. मात्र नात्यात भांडणं होऊ लागली तेव्हा गौतमी यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आपल्या ब्लॉगमध्ये लिहिले होते की, 'वेगळं होण्याचा निर्णय घेणं सोप्पं नव्हतं. पण स्वप्नांना तिरांजली वाहणंही कठीण होतं.' यासोबतच त्यांना कोणाचीही सहानूभूती नको असल्याचं सांगितलं.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3jycb5a