मुंबई: राज कपूर यांची पेशावरमधील पिढीजात हवेली आता जमीनदोस्त होणार असल्याची चर्चा सुरू आहे. हवेलीच्या मालकांनी या ठिकाणी शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. गेल्या काही वर्षांपासून कपूर घराण्याची ही हवेली चर्चेत होती. पण सध्या ही कपूर हवेलीचे मालकी हक्क जवाहिऱ्या हाजी मोहम्मद इसरार यांच्याकडं असून त्यांनी या जागेवरी खासगी बांधकाम करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहे. राज कपूर यांचे हे वडिलोपार्जित घर पेशावरमधील किस्सा ख्वानी बाजार या परिसरात आहे. ही वास्तू '' या नावानं ओळखली जाते. तिचे बांधकाम भारत-पाकिस्तान फाळणी होण्याआधी, १९१८ ते १९२२ या काळात झालं असून राज कपूर यांचे आजोबा देवान बशेश्वरनाथ कपूर (Dewan Basheswarnath Kapoor) यांनी ही वास्तू बांधली होती. राज कपूर आणि त्यांचे काका, अभिनेते त्रिलोक कपूर यांचा जन्म या वास्तूमध्ये झाला होता. खैबर-पख्तूनख्वा प्रांत सरकारनं या वास्तूला राष्ट्रीय वारसास्थळ म्हणून घोषित केलं होतं. दोन वर्षांपूर्वी म्हणजेच २०१८ साली पाकिस्तानातील खैबर-पख्तूनख्वा प्रांताच्या सरकारनं फाळणीपूर्व काळात बांधण्यात आलेल्या २५ वास्तू विकत घेण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी ६१ कोटींचं बजेट ठरविण्यात आलं आहे. या इमारतींमध्ये कपूर हवेलीचाही समावेश होता. तसंच दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांनी वडिलोपार्जित घराचे रूपांतर वस्तू संग्रहालयात करण्यात यावा अशी विनंती तिथल्या सरकारला केली होती. त्यानुसार पाकिस्तान सरकारनं कपूर हवेलीचं रुपांतर संग्रहालयात करण्याचा निर्णय घेतला होता. पण सध्याचे या हवेलीचे मालक यांनी हवेली सरकारला देण्यास मनाई केली आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3fvjnwE