Full Width(True/False)

मिथिला पालकरची ऑडिशनची मेहनत व्यर्थ गेली

मुंबई- सुशांतसिंह राजपूतच्या निधनानंतर बॉलिवूडमध्ये घराणेशाहीच्या मुद्द्याने पुन्हा डोकं वर काढलं. याबद्दल सोशल मीडियावर खूप काही बोललंही गेलं. सुशांतने घराणेशाहीला कंटाळून आत्महत्या केली असा आरोप सुशांतच्या चाहत्यांनी केला आहे. दरम्यान अभिनेत्री मिथिला पालकरने घराणेशाहीशी निगडीत तिचे काही अनुभव शेअर केले. इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत मिथिलाने बॉलिवूडमध्ये होणाऱ्या 'फेवरेटिज्म'बद्दल बोलली. तिच्यासोबत घडलेला एक अनुभव शेअर करताना मिथिला म्हणाली की, एकवेळ अशी होती की तिने दिलेल्या ऑडिशनमध्ये अशा अभिनेत्रीची निवड झाली, जिने त्या भूमिकेसाठी कधी ऑडिशनच दिली नाही. याबद्दल अधिक सांगताना मिथिला म्हणाली की, 'एका प्रोजेक्टसाठी आम्ही १० मुलींनी ऑडिशन दिलं होतं. पण आमच्यापैकी कोणालाच ती भूमिका मिळाली नाही. उलट या भूमिकेसाठी अशा अभिनेत्रीची निवड झाली जिने ऑडिशनच दिलं नव्हतं.' मिथीला पुढे म्हणाली की, 'एक अशी यंत्रणा हवी जिथे लोकांना असं वाटू नये की त्यांच्यावर अन्याय झाला. सर्वांना समसमान संधी मिळाली पाहिजे.' मिथिला पालकरने 'मुरांबा', 'कट्टी बट्टी', 'कारवां', 'चॉपस्टिक्स' या सिनेमांत काम केलं आहे. याशिवाय 'गर्ल इन द सिटी', 'लिटिल थिंग्स' या तिच्या मालिका विशेष गाजल्या. सोशल मीडियावर मिथिला प्रसिद्ध असून तिचं फॅनफॉलोविंगही चांगलं आहे. कोणतीही पार्श्वभूमी नसताना मिथिला पालकरने स्वबळावर आणि कष्टाने स्वतःचं नाव कमावलं आहे. 'वेब क्वीन' म्हणून ओळखली जाणारी स्टायलिश लुक आणि हटके फॅशनमुळे नेहमीच चर्चेत असते. तिच्या अधिकृत सोशल मीडियावर अकाउंटवर आपल्याला वेगवेगळ्या अंदाजातील फोटो पाहायला मिळतात. मिथिला आपल्या चाहत्यांसाठी कधी वेस्टर्न लुक, कधी बबली किंवा बोल्ड लुक तर कधी पारंपरिक अंदाजातील फोटो शेअर करत असते.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3iS8uad