Full Width(True/False)

याआधीच पोलिसांना सुशांतच्या घरच्यांनी केलं होतं सावध

मुंबई- सुशांतसिंह राजपूतच्या निधनानंतर आता जवळपास दिड महिन्यांनी या प्रकरणाने नवं वळण घेतलं आहे. सुशांतच्या वडिलांनी यांनी रिया चक्रवर्तीविरोधात एफआयआर दाखल केली आहे. यानंतर सुशांतच्या वकिलांनी अनेक धक्कादायक खुलासेही केले. त्यांच्यामते, सुशांतच्या कुटुंबियांनी २५ फेब्रुवारीला वांद्रे पोलीस ठाण्यात सुशांत चुकीच्या व्यक्तींसोबत राहत असल्याची सुचना दिली होती. यासोबतच त्याच्यासोबत काही अनर्थ होणार असल्याची भीतीही त्यांनी बोलून दाखवली होती. २५ फेब्रुवारीला मुंबई पोलिसांना दिली होती सुचना यासोबतच सुशांतच्या वडिलांच्या वकिलांनी यांनी अनेक धक्कादायक खुलासेही यावेळी केले. सुशांतच्या कुटुंबाला आधीपासूनच त्याच्यासोबत काहीतरी चुकीचं होईल याची भीती वाटत होती. यासाठीच २५ फेब्रुवारी २०२० रोजी वांद्रे पोलीस ठाण्यात यासंबंधी माहिती दिली होती. तक्रार नोंदवून घेण्यास तयार नव्हती पोलीस पटणा पोलीस याआधी रिया चक्रवर्तीची तक्रार नोंदवून घेण्यास फारसे तयार नव्हते. मात्र मुख्यमंत्री नितीश कुमार आणि मंत्री संजय झा यांच्या मध्यस्थीने अखेर त्यांनी तक्रार नोंदवून घेतली. मुंबई पोलिसांवर मोठा आरोप वकील विकास यांनी मुंबई पोलिसांनी एफआयआर दाखल करून न घेतल्याचा आरोप केला. यासोबतच मुंबई पोलिसांनी कुटुंबावर बड्या प्रोडक्शन हाउसचं नाव पुढे आणण्याचा आणि त्यांना फसवण्याचा दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचंही ते म्हणाले. मृत्यूची चौकशी वेगळ्याच मार्गावर जात असल्याचं त्यांनी म्हटलं. पटणा पोलिसांचाही आला जबाब सुशांतच्या वडिलांच्या वकिलांनी यावेळी बिहारचे मुख्यमंत्र्यांचेही आभार मानले. तसेच पटणाचे सिटी एसपी विनय तिवारी म्हणाले की, आता एफआयआर दाखल झालंय. प्राथमिक चौकशीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे कोणावर प्रश्न उपस्थित करायचे यावर बोलणं योग्य राहणार नाही. सुशांतच्या वडिलांनी ज्या ज्या नावांचा उल्लेख केला त्या सर्वांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. दरम्यान, रियाने आता तिची बाजू मांडण्यासाठी देशातील सर्वात मोठ्या आणि महागड्या वकिलाची नियुक्ती केली आहे. आता तिची ही केस लढणार आहेत. याआधी मानेशिंदे यांनी सलमान खान आणि संजय दत्तची केस सांभाळली होती.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3faC47I