मुंबई: करोनाच्या संसर्गामुळे साडेतीन महिने चित्रीकरणाची कामं ठप्प होती. मालिका, चित्रपटांचं चित्रीकरण होत नसल्यानं मनोरंजनसृष्टीतील , , छोटे यांच्यासमोर रोजीरोटीचा प्रश्न उभा राहिला होता. सुप्रसिद्ध अभिनेते या तंत्रज्ञ, कलाकारांच्या मदतीला पुढे सरसावले आहेत. त्यांनी जीवनावश्यक वस्तूंचे किट अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या सभासदांसाठी देऊ केले आहेत. महामंडळाच्या सहकार्यवाह चैत्राली डोंगरे यांच्याकडे ते नुकतेच सुपूर्द करण्यात आले. मनोरंजनसृष्टीतल्या कर्मचाऱ्यांना, तंत्रज्ञांकडून आतापर्यंत काही कलाकारांकडून मदतीचा हात देण्यात आला आहे. अक्षयकुमार, अमिताभ बच्चन यासारख्या बड्या स्टार्सनी यापूर्वी मदत देऊ केली. प्रेक्षकांचे लाडके जग्गू दादा, अभिनेते जॅकी श्रॉफही यासाठी पुढे आले. 'करोनामुळे सध्याची परिस्थिती अतिशय गंभीर आहे. अशावेळी एकमेकांना मदत करणे, मानसिक आधार देणं खूप गरजेचं आहे. चित्रपटसृष्टीतील सगळ्यांना करोनामुळे त्रास झाला असला, तरी पडद्यामागील तंत्रज्ञ वर्गाला याचा विशेष फटका बसला आहे. त्यांना माझ्याकडून जास्तीजास्त मदत करण्याचा माझा प्रयत्न आहे', अशा भावना जॅकी श्रॉफ यांनी बोलून दाखविल्या. जॅकी श्रॉफ यांनी दिलेल्या या मदतीबद्दल अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी त्यांचे आभार मानले आहेत. वरुण धवनही आपणही मागे नाही करोनाच्या संकटकाळात अनेक स्टार्सनी आपापल्या परीनं मदतीचा हात पुढे केला. अभिनेता वरुण धवननं आपणही यात मागे नाही हे दाखवून दिलंय. चित्रपटांत हिरो-हिरॉइन्सच्या मागे नृत्य करणाऱ्या सुमारे दोनशेहून अधिक डान्सर्सच्या मदतीला तो धावून आला आहे. त्यांच्या बँक खात्यामध्ये त्यानं काही रक्कम जमा केली. बॅकग्राउंड डान्सर राज सुराणीनं सोशल मीडियावर एक फोटो शेअर केल्यामुळे ही गोष्ट सर्वांना कळली. डान्सर राज सुराणीनं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की वरुणनं गरजूंना मदत केली. यापैकी अनेकांनी वरुणबरोबर नृत्यावर आधारित तीन चित्रपटांत काम केलं आहे. चित्रीकरण बंद असल्यामुळे वरुणला त्यांची चिंता वाटत होती. त्यांना मदत करण्याचं आश्वासन वरुणनं दिलं होतं. अनेक बॅकग्राऊंडान्सरकडे आई-वडिलांसाठी औषधं आणण्यासाठी, घराचं भाडं देण्यासाठी देखील पैसे नव्हते. त्यांना वरुणमुळे मदत मिळाली आहे. या पोस्टमध्ये त्यानं वरुण धवनचे आभार मानले आहेत. याआधीही त्यानं करोनाग्रस्तांसाठी लाखो मदत केली आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2ZnQE7n