Full Width(True/False)

सॅमसंगचा फोन ४ हजार रु स्वस्त, कॅशबॅकही मिळणार

नवी दिल्लीः चा बजेट प्रीमियम फोन स्वस्त झाला आहे. कंपनीने या फोनच्या किंमतीत ४ हजार रुपयांची कपात केली आहे. या कपातीनंतर गॅलेक्सी नोट १० लाइटच्या ६ जीबी रॅम च्या फोनची किंमत ४१ हजार ९९९ रुपयांवरून ३७ हजार ९९९ रुपये झाली आहे. तर ८ जीबी रॅम व्हेरियंटची किंमत आता ४३ हजार ९९९ रुपयांऐवजी ३९ हजार ९९९ रुपये झाली आहे. वाचाः ५ हजार रुपयांचा कॅशबॅक फोनच्या कपातीनंतर कंपनी या फोनवर आणखी एक ऑफर देत आहे. सिटी बँकेच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डवरून पेमेंट केल्यास युजर्सला ५ हजार रुपयांचा कॅशबॅक मिळणार आहे. कॅशबॅक ऑफर सोबत हा फोन ग्राहकांना केवळ ३२ हजार ९९९ रुपयांत खरेदी करता येवू शकतो. तर ८ जीबी रॅम च्या फोनसाठी ३४ हजार ९९९ रुपये मोजावे लागतील. वाचाः या युजर्संना २ हजार रुपयांचा कॅशबॅक जर कोणत्या युजर्सकडे सिटी बँकेचे क्रेडिट किंवा डेबिट कार्ड नसेल तर ते युजर्स २ हजार रुपयांचा कॅशबॅकचा फायदा घेवू शकतात. तसेच फोनला कंपनी ९ महिन्याच्या आकर्षक नो कॉस्ट ईएमआयवर सुद्धा खरेदी करण्याची संधी देत आहे. गॅलेक्सी नोट १० लाइटचे वैशिष्ट्ये फोनमध्ये 1080x2340 पिक्सल रेजॉलूशन दिले आहे. फोनमध्ये ६.७ इंचाचा फुल एचडी प्लस इनफिनिटी-O सुपर AMOLED डिस्प्ले दिला आहे. अँड्रॉयड 10 वर बेस्ड OneUI वर फोन चालतो. हा फोन एस पेन सोबत येतो. ८ जीबी रॅम पर्यंत असलेल्या फोनवर Exynos 9810 एसओसी प्रोसेसर मिळणार आहे. वाचाः फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. यात तीन १२ मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये फ्रंटला ३२ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. फोनची इंटरनल मेमरी १२८ जीबीची आहे. मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने ती १ टीबीपर्यंत वाढवता येवू शकते. फोनला पॉवर देण्यासाठी यात 4500mAh बॅटरी दिली आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/39czEUM