Full Width(True/False)

अनुपम खेर यांच्या आईची करोनावर मात; शेअर केला व्हिडिओ

मुंबई: बॉलिवूड अभिनेते यांच्या आई यांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. अनुपम यांनी एक व्हिडिओ शेअर करत चाहत्यांनी ही चांगली बातमी सांगितली. गेल्या आठवड्यात अनुपम यांच्या घरातील चौघांचे करोना रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आले होते. त्यामुळं त्यांच्या घरात चिंतेचं वातावरण होतं. त्यांची आई, भाऊ, वहिणी आणि भाचा या चौघांना करोनाची लागन झाली होती. दुलारी यांच्यावर कोकिलाबेन रुग्णालयात उपचार सुरू होते. पाच-सहा दिवसांच्या उपचारानंतर त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. त्यामुळं त्यांना आता घरी जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. यापुढं त्या होम क्वारंटाइन राहणार आहेत. अनुपम यांनी व्हिडिओ शेअर करत चाहते, डॉक्टर्स आणि मुंबई पालिकेचे अधिकारी यांचे आभार मानले आहेत. 'कोकिलाबेन रुग्णालयातील डॉक्टरांनी आईची तब्येत आता बरी असल्याचं सांगितलं आहे. आता तिला घरी जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. पुढंचे ८ दिवस तिला होम क्वारंटाइन राहावं लागणार आहे', असं अनुपम यांनी त्यांच्या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे. कठिण काळात आईची मदत केलेल्या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचेही त्यांनी आभार मानले आहेत. दरम्यान, सध्या मुंबई महानगरपालिकेनं राबवलेला मुंबई पॅटर्नची जगभरात चर्चा आहे. महापालिकेनं राबवलेल्या उपाययोजनांमुळं करोनाचा संसर्ग अटोक्यात आणण्यात यश आलं आहे. मात्र, असं असतानाच मुंबईतील आजची आकडेवारी चिंता वाढवणारी आहे. आज मुंबईत ६४ रुग्णांचा मृत्यू झाला असून एकूण करोना मृतांची संख्या ५ हजार ७११ इतकी झाली आहे. मुंबईतील रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी आणखी वाढून सरासरी ५५ दिवसांवर पोहोचला. तर रुग्णवाढीचा सरासरी दर आणखी कमी होऊन १.२६ टक्के झाला आहे. समाधानकारक बाब म्हणजे, आज मुंबईतील १ हजार १९३ रुग्णांनी करोनावर यशस्वीपणे मात केली आहे. त्यामुळं एकूण ७१ हजार ६८५ रुग्ण बरे होऊन सुखरुप घरी परतले आहेत. त्यामुळं रुग्णांचा रिकव्हरी रेट ७० टक्के आहे. तर एकूण २३ हजार ८२८ रुग्ण सध्या विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3jpznSS