मुंबई- दरवर्षी प्रमाणे यावर्षीही इन्स्टाग्रामची कोट्यवधींची कमाई करणाऱ्या सेलिब्रिटींची यादी जाहीर झाली. विशेष म्हणजे या यादीत फक्त एकाच बॉलिवूड स्टारचं नाव आहे ते म्हणजे सुपरस्टार . यासोबतच या यादीत समाविष्ट होणारी ती पहिली भारतीय अभिनेत्री झाली. इन्स्टाग्रामच्या शेड्यूलिंग टूल HopperHQ ने ही यादी शेअर केली आहे. या यादीनुसार, प्रियांका चोप्रा यात २८ व्या स्थानावर आहे. प्रियांका तिच्या प्रत्येक पोस्टमधून कोट्यवधींची कमाई करते. देसी गर्ल एक पोस्टचे जवळपास २ कोटी १६ लाख रुपये घेते. गेल्यावर्षी प्रियांका या यादीत १९ व्या स्थानावर होती. प्रियांकाशिवाय या यादीत भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार विराट कोहलीही आहे. विराट या यादीत प्रियांकाच्या दोन स्थानवर म्हणजे २६ व्या स्थानावर आहे. विराट एक इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करण्यासाठी अंदाजे २ कोटी २१ लाख रुपये घेत असल्याचं म्हटलं जातं. या यादीत प्रियांका आणि विराट हे दोनच भारतीय सेलिब्रिटी आहेत. या यादीत अग्रणी अभिनेता ड्वेन जॉनसनचं नाव आहे. ड्वेन त्याच्या इन्स्टाग्रामवरून सर्वात जास्त कमाई करतो. ड्वेनशिवाय कायली जेनर, क्रिस्टियानो रोनाल्डो, किम कार्दशियन, सेलेना गोमेज, एरियाना ग्रांडे, बियॉन्से नोल्स, जस्टिन बीबर, टेलर स्विफ्ट यांच्या नावाचाही समावेश आहे. गेल्या वर्षीही प्रियांका आणि विराट हे दोघं भारतीय या यादीत समाविष्ट होतं. प्रियांकाच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर एबीसी स्टूडिओची क्वांटिको सीरिजचा तिसरा सीझन संपून दोन वर्ष झाली. आता प्रियांकाने प्राइम व्हिडिओसोबत दोन वर्षाची डील साइन केली आहे. या डीलसाठी प्रियांकाला भली मोठी रक्कम देण्यात आली आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2W0EsY2