मुंबई: आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अनेक कलाकार सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. चाहत्यांना अनेकदा ते स्वतःहून प्रतिसाद देतात. त्यांच्या प्रश्नांना उत्तरं दिलखुलासपणे उत्तरं देतात. परंतु, सोशल मीडियावरील आपल्या एखाद्या पोस्टमुळे कलाकारांवर काही वेळा ट्रोल होण्याची वेळ येते. असाच काहीसा प्रकार टीव्ही अभिनेत्री हिच्याबरोबर घडला. एका फोटोमुळे रश्मीला काही करण्याचा प्रयत्न केला. पण, अश्लील कमेंट करणाऱ्या या ट्रोलर्सना दम देत, त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करणार असल्याचं रश्मीनं म्हटलं आहे. रश्मीनं इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला होता. हा फोटो काही नेटकऱ्यांना आवडला नाही. त्यांनी त्यावर काही आक्षेपार्ह आणि अश्लील कमेंट करत रश्मीला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. या ट्रोलर्सविरोधात रश्मीनं संताप व्यक्त केला असून, त्यांना चांगलेच खडे बोल सुनावले आहेत. ती म्हणते, 'घरातील महिलांच्या बाबतीतही तुम्ही असेच विचार करता का? असे संस्कार तुमच्या पालकांनी तुमच्यावर केले आहेत का? सोशल मीडियावर लिहिण्यापूर्वी आपण नेमकं काय लिहितोय याचा एकदा विचार करावा. कारण, जे लिहिलं आहे तशा प्रकारचे विचार फक्त अशिक्षित लोकच करू शकतात.', अशा Dअसून, कायदेशीर कारवाई करण्याचा धमकीवजा इशाराही तिनं त्यांना दिला आहे. त्यामुळे सध्या तिच्या या पोस्टची सोशल मीडियावर आणि टीव्ही विश्वात चर्चा आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2YTV9Wu