मुंबई: बॉलिवूडमधील निर्माता, दिग्दर्शकांनाही ज्यांच्यापुढं नमून राहावं लागायचं, अनेक तारेतारकांना आपल्या तालावर नाचायला लावणाऱ्या प्रसिद्ध कोरिओग्राफर यांच्या निधनानं बॉलिवूडमध्ये एक प्रकारची न भरुन निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. अनेक अभिनेत्रींनी त्यांच्यासाठी भावुक असे संदेश लिहिले आहेत. सर्वांनाच माहित आहे की, ही त्यांची आवडती अभिनेत्री होती. तसंच तिच्या आयुष्यात देखील सरोज खान यांचं महत्त्वाचं स्थान होतं. काल गुरुपौर्णिमेनिमित्त तिनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. बॉलिवूड डान्समध्ये माधुरीची जादू आजही कायम आहे. याचं सर्व श्रेय हे सरोज यांना जातं. त्यांच्या आठवणी कायमचं स्मरणाच राहणार आहेत. माधुरीनंही तिच्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे. ' मला अजूनही विश्वास बसत नाहीए की, सरोजजी आज आपल्यात नाहीत. त्यांच्या सारखी मैत्रिण, मार्गदर्शक आणि गुरु गमावणं माझ्यासाठी खूपच वेदनादायक आहे. माझ्या वेदना शब्दांत व्यक्त करणं अवघड आहे. जेव्हा त्या हॉस्पिटलमध्ये होत्या, मी त्यांच्या मुलीसोबत बोलले होते. त्यांच्या मुलीनं देखील त्या लवकरच बऱ्या होतील असं सांगितलं होतं. पण दोन दिवसानंतर त्या आपल्याला सोडून निघून गेल्या. आमच्यात गुरु-शिष्याचं नातं होतं. परंतु सेटवर त्या माझ्या आईची उणीव भरुन काढायच्या. मला या सगळ्या गोष्टींची खूप आठवण येणार आहे. गुरुपौर्णिमेनिमित्त मी त्यांनी श्रद्धांजली वाहतेय. या पुरुष प्रधान सिनेइंडस्ट्रीत त्यांनी स्वत:चं स्थान निर्माण केलं होतं. त्यांचं आयुष्य असामान्य असं होतं', असं माधुरी हिनं तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. २२ नोव्हेंबर १९४८ रोजी सरोज खान यांचा जन्म झाला होता. वयाच्या तिसऱ्या वर्षांपासून त्यांनी बालकलाकार म्हणून काम करायला सुरुवात केली होती. त्यांना लहानपणापासून नृत्याची आवड होती. विशेष म्हणजे त्यांनी नृत्याचं कोणतंही शिक्षण घेतलं नव्हतं. सरोज खान यांनी दोन हजारांहून अधिक गाण्यांचं नृत्य दिग्दर्शन केलं होतं. त्यांना तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. संजय लीला भन्साळी यांच्या 'देवदास'मधील 'डोला रे डोला', माधुरी दीक्षितच्या 'तेजाब' सिनेमातील 'एक दो तीन' आणि २००७ मध्ये आलेल्या 'जब वी मेट' सिनेमातील 'ए इश्क हाए' या गाण्यांसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. तसंच 'मैं नागिन तू सपेरा' आणि 'हवा हवाई' ही त्यांची गाणी प्रचंड गाजली होती.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2Z28VXu