नवी दिल्लीः दक्षिण कोरियाची इलेक्ट्रॉनिक कंपनी LG भारतीय बाजारात पुन्हा एकदा एन्ट्री घेण्याची तयारी करीत आहे. कंपनी १५ हजारांपेक्षा कमी किंमतीतील स्मार्टफोन लाँच करण्याची तयारी करीत आहे. भारतात सध्या चीन विरोधात लोकांची प्रचंड नाराजी आहे. भारतातील अनेक लोक चायनीज वस्तूंवर बहिष्कार घालत आहेत. एलजी कंपनी याचा फायदा घेण्याच्या विचारात आहे. गेल्या काही दिवसांपासून भारत - चीन या दोन देशात तणाव निर्माण झाला आहे. त्यानंतर भारत सरकारने चीनच्या ५९ अॅप्सवर बंधी घातली आहे. लोकांत नाराजी असल्याने चिनी उत्पादनांवर परिणाम झाला आहे. वाचाः १५ पट उत्पादन वाढवणार एलजी LG भारतीय मार्केटमध्ये आपला शेयर वाढवण्यासाठी उत्पादन वेग वाढवणार आहे. कंपनी भारतात १५ पट प्रोडक्शन वाढवण्यासाठी तयार आहे. कंपनी भारतात दिवाळी फेस्टिव्हल सीझनचा फायदा उचलण्याच्या तयारीत आहे. १० पट वाढली एलजीच्या फोनची विक्री भारतात चीन विरोधी मोहिमेचा अन्य कंपन्यांना फायदा होताना दिसत आहे. LG Electronics चे बिझनेस हेड अद्वैत वैद्य यांनी सांगितले की, चीन सोबत तणाव निर्माण झाल्यानंतर एलजीच्या फोनची मागणी वाढली आहे. आतापर्यंतच्या सेलमध्ये १० पट जास्त विक्री झाली आहे. वाचाः स्वस्त फोन लाँच करणार एलजी एलजीचे बिझनेस हेड यांनी स्पष्ट केले आहे की, कंपनीने सर्वात जास्त फोकस स्वस्तातील सेगमेंटवर होणार आहे. या सेगमेंटमध्ये १५ हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीचे स्मार्टफोन लाँच करणार आहे. तसेच डिस्ट्रिब्यूशनसाठी ऑनलाइन चॅनेल्सवर जास्त फोकस करणार आहे. कोविड १९ संसर्गामुले ऑनलाइनची विक्री खूप वाढली आहे. भारतात कंपनी अनेक स्मार्टफोन मॅन्यूफॅक्चरिंग करीत आहे. गेल्या वर्षी कंपनीने W सीरीजचे काही फोन भारतीय बाजारात बनवून ते आफ्रिका आणि अन्य मिडल इस्ट देशात एक्सपोर्ट केले होते. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2O0VmRT