मुंबई- देशभरात सध्या सुशांतसिंह राजपूतच्या केसकडे लक्ष आहे. मंगळवारी सुशांतच्या वडिलांनी केके सिंह यांनी रिया चक्रवर्तीविरोधाक एफआयआर दाखल केल्यानंतर अचानक या केसला वेग आल्याचं दिसलं. यासोबतच रियाने आता तिची बाजू मांडण्यासाठी देशातील सर्वात मोठ्या आणि महागड्या वकिलाची नियुक्ती केली आहे. आता तिची ही केस लढणार आहेत. याआधी मानेशिंदे यांनी सलमान खान आणि संजय दत्तची केस सांभाळली होती. रियाने सलमान आणि संजयच्या वकिलाचीच का केली निवड- सुशांतच्या मृत्यूप्रकरणाच्या चौकशीने आता वेगळं वळण घेतलं आहे. सुशांतच्या वडिलांनी रियावर अनेक गंभीर आरोप करत तक्रार दाखल केली. सुशांतला आत्महत्येसाठी उकसावण्यासारखा आरोप त्यांनी केला. आता रियाने वकील सतीश यांची निवड केली. १९९८ मधील काळवीट शिकार प्रकरण असो की संजय दत्तची १९९३ मधील मुंबंई साखळी हल्ला असो दोघांचीही वकिली मानेशिंदे यांनी केली होती. आज रिया अंतरिम जामीनसाठी अर्ज करू शकते. मंगळवारी रियाच्या घरी दिसली होती वकिलांची टीम रिपोर्ट्सनुसार, मानेशिंदे यांनी अंतरिम जामीनसाठी मंगळवारीच पेपर्स पुढे केले होते. यानंतर कनिष्ठ वकील आनंदिनी फर्नांडिसला रियाच्या घरी पाहण्यात आलं. सुशांतच्या वडिलांनी सात पानी एफआयआरमध्ये सुशांतच्या अकाउंटमधून १५ कोटी रुपये ट्रान्सफर केल्याची माहिती दिली होती. रिया आणि तिचं कुटुंब जाणीवपूर्वक सुशांतला मानसिकरित्या आजारी असल्याचं दाखवत होते असंही केके सिंह म्हणाले. सुशांतच्या कंपन्यांचीही होणार चौकशी रिपोर्टनुसार, सुशांतचे वडील आणि बहिणीचा नवरा (भावजी) मुंबई पोलिसांच्या जॉइन्ट सीपी (लॉ अँड ऑर्डर) यांनाही भेटले होते. पण सुरुवातीला अशा प्रकारचा संशय असल्याचा त्यांनी कधीच उल्लेख केला नव्हता. मुंबई पोलीस अजूनही त्याच्या तीन कंपन्यांची चौकशी करत आहे. यातील काही कंपन्यांमध्ये रिया आणि तिच्या भावाची शॉविकची भागीदारीही होती. सुशांतनेच कंपन्यांवर केला होता सारा खर्च पोलिसांच्या रिपोर्टनुसार सुरुवातीला रियाच्या भावाची चौकशी करण्यात येणार होती. कारण दोघांनी मिळून कंपनी स्थापन केली असल्याचं दाखवण्यात आलं आहे. पण या कंपन्यांमध्ये सर्व पैसा सुशांतचाच होता.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3f7oRfJ