Full Width(True/False)

जावेद जाफरीने दाखवली आपुलकी, लोकांनी केलं कौतुक

मुंबई- ज्येष्ठ अभिनेते यांचे बुधवारी रात्री निधन झाले. वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. माझगाव येथील शिया दफनभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी जगदीप यांचं पूर्ण कुटुंब एकत्र होतं. यावेळी जगदीप यांचा मुलगा आणि अभिनेता ने असं काही केलं की साऱ्यांनीच त्याचं कौतुक केलं. वडिलांच्या अंत्यसंस्कारानंतर जावेद जाफरीने प्रसारमाध्यमाशी संवाद साधला. यावेळी त्याने आपुलकीने तिथे उभ्या असलेल्या प्रसारमाध्यमातील व्यक्तींची चौकशी केली. त्यांनी चहा प्यायला का विचारलं.. एवढंच नाही तर दुःखाच्या काळातही जावेद प्रसारमाध्यमांचे आभार मानायला विसरला नाही. याचमुळे सोशल मीडियावर त्याच्या साधेपणाचं कौतुक केलं जात आहे. मानव मंगलानीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये जावेद अनेकांशी आपुलकीने बोलताना दिसत आहे. यावेळी जावेदी म्हणाला की, 'माफ करा तुमची विचारपुस करायला थोडा वेळ झाला. तुम्ही सर्वांनी चहा प्यायला का.. आम्ही तुमचे आभारी आहोत. ज्या लोकांनी आम्हाला मेसेज पाठवले त्यांना आम्ही उत्तर देऊ शकलो नाही. पण आम्ही सर्वांचे आभारी आहोत. आम्ही सर्वांचे मेसेज पाहू शकलो नाही पण माझ्या वडिलांनी ७० वर्षांमध्ये खूप सन्मान मिळवला याची जाणीव झाली. त्यांना भरभरून प्रेम मिळालं.' करोना व्हायरसमुळे जगदीप यांच्या अंत्यसंस्काराला त्यांच्या घरातील आणि सिनेसृष्टीतील मोजक्या व्यक्तीच उपस्थित होत्या. यावेळी जॉनी लिवर यांनीही जावेद जाफरीची आस्थेने विचारपूस केली. जगदीप गेली अनेक वर्ष कर्करोगाशी लढा देत होते. यासोबतच वयोमानाने होणाऱ्या अनेक व्याधींचा ते सामना करत होते. 'शोले' चित्रपटात 'सूरमा भोपाली'ची भूमिका जगदीप यांनी साकारली होती. या भूमिकेमुळे त्यांना फार मोठं ग्लॅमर मिळालं होतं. जगदीप यांचं मूळ नाव सय्यद इश्तियाक जाफरी असं होतं. जगदीप यांच्या पश्चात मुलगा जावेद जाफरी, निर्माता व दिग्दर्शक नावेद, मुलगी मुस्कान जाफरी व दुसरी पत्नी नाझिमा असा परिवार आहे. जगदीप यांनी प्रदीर्घ काळ सिनेसृष्टीची सेवा केली. तब्बल ४०० चित्रपटांमधून त्यांनी भूमिका साकारली. त्यांच्या निधनाने एका दिग्गज विनोदी कलावंताला बॉलीवूड मुकल्याची भावना विविध कलावंतांनी व्यक्त केली. जगदीप यांचा जन्म स्वातंत्र्यपूर्व काळात २९ मार्च १९३९ रोजी दतिया सेंट्रल प्रांतात झाला. चंदेरी दुनियेत त्यांनी बालकलाकार म्हणून पहिले पाऊल ठेवले. बी. आर. चोप्रा यांच्या अफ्साना चित्रपटात त्यांनी काम केले होते. त्यानंतर ब्रह्मचारी चित्रपटात त्यांनी विनोदी भूमिका साकारली आणि आपल्या अभिनयाची छाप सोडली. पुराना मंदिर, थ्री डी सामरी या चित्रपटांतील त्यांच्या भूमिकाही गाजल्या. जगदीप यांच्या विनोदी भूमिकांनी प्रेक्षकांना निखळ मनोरंजन दिले. १९७५ मध्ये प्रदर्शित झालेल्या शोले चित्रपटाने अनेक विक्रम प्रस्थापित केले. या चित्रपटात जगदीप यांनी सूरमा भोपाली हे पात्र साकारले होते. या भूमिकेने जगदीप यांना नव्या उंचीवर नेऊन ठेवले. त्यानंतर १९९४ मध्ये अंदाज अपना अपना या गाजलेल्या चित्रपटातही जगदीप यांनी भूमिका साकारली होती.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2ZTiK9q