मुंबई: अभिनेता याच्या आत्महत्येला उद्या १४ जुलैरोजी एक महिना पूर्ण होईल. एक महिना उलटून गेला तरी त्याच्या च्याहत्यांना तो आता या जगात नाहीए यावर विश्वास ठेवणं कठिण जातंय. सुशांतनं आत्महत्या केल्यानंतर त्यामागची कारणं शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. सुशांतचा मृत्यू गळफास घेतल्यानंच झाला असल्याचं शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झालं आहे. वांद्रे पोलिस ठाण्यात याप्रकरणी अपमृत्यूची नोंद करण्यात आली असली तरी पोलिसांनीही त्यांचा तपास आणि चौकशी सुरू ठेवली आहे. नुकत्याच एका पोलिस अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार सुशांत लॉकडाऊनपूर्वी आठवडाभर हिंदुजा रुग्णालयात उपचार घेत होता. सुशांतच्या आत्महत्येचं मुख्य कारण हे त्याचं डिप्रेशन असल्याचं सांगितलं जात असून याच्याच उपचारासाठी ते हिंदुजा रुग्णालयात अॅडमिट झाला होता. सुशांतनं आत्महत्याच केली असून हत्येचा कटाचा कोणताही पुरावा मिळाला नसल्याचंही या अधिकाऱ्यानं सांगितलं आहे. सुशांतनं आत्महत्या का केली याचंही उत्तर आम्हाला जवळजवळ मिळालं आहे, असंही ते म्हणाले. डिप्रेशनचे दोन भयावह आजार आहेत ज्यांनी सुशांतला ग्रासलं होतं.या दोन मानसिक आजारांनीच त्याचा जीव घेतला असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. पॅरानोया आणि बायपोलक डिसऑर्डर या दोन आजारांनी सुशांत ग्रासला होता. या आजारांवर हिंदुजा रुग्लालयात त्यानं आठवडाभर उपचार घेतले होते. 'पॅरानोया' हा एक संशयाचा आजार आहे. यात आपल्या जवळच्या व्यक्ती आपला द्वेश करतायत असं वाटू लागतं. एकांतात असताना कोण तरी आपल्याला संपवण्यासाठी प्रयत्न करतंय, असा विचार सतत डोक्यात येत असतो. तसंच बायपोलक आजारात व्यक्तीच्या स्वभावात सतत चढउतार पाहायला मिळतात. कधी तो एकदम तणावात असतो तर कधीतरी व्यक्तीचा आत्मविश्वास अचानक वाढतो. त्यामुळं हे दोन आजार त्याच्या आत्महत्येला कारणीभूत ठरल्याचं म्हटलं जात आहे. पोलिस तपासादरम्यान आणखी एक महत्त्वाची माहिती समोर आली असून सुशांतची आई देखील डिप्रेशनच्या आजारानं ग्रस्त होती. तिच्यावरही दिर्घकाळ उपचार सुरू होते. सुशांत अवघा १६ वर्षांचा होता तेव्हा त्यांचं निधन झालं होतं. सुशांतला चार बहिणी आहेत. चौघींचीही लग्नं झाल्यानं वडिल एकटेच बिहारमधल्या घरी राहायचे. सुशांत एकटा मुंबईत राहायचा. हेच एकटेपण त्याला खायला उठायचं. त्यामुळं त्यांचं डिप्रेशन आणखी वाढतं गेल्याचंही तपासात पुढं आलं आहे. फॉरेन्सिक विभागाकडून तपास वांद्रे पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत ३६ जणांचा जबाब नोंदवून घेतल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे. तसेच, सुशांतच्या घरातून हस्तगत केलेल्या वस्तूंची फॉरेन्सिक विभागाकडून तपास सुरू आहे. सुशांतसिंहच्या आत्महत्येसंदर्भात सोशल मीडियावर कोणतीही संभ्रम निर्माण करणारी माहिती न पसरविण्याचंही आवाहन पोलिसांनी केलं आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/302Zg2i