Full Width(True/False)

शिवरायांचा 'अपमान' करणाऱ्या तरुणीला बलात्काराची धमकी

मुंबई- स्टॅण्डअप कॉमेडियन मुलीचा एक जुना व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केल्याचा आरोप अनेकांनी केला. यानंतर कॉमेडियनने सोशल मीडियावर यासंबंधी माफीही मागितली. मात्र तरीही तिच्या विरोधात सोशल मीडियावर अनेक कमेन्ट केल्या जात आहेत. एका व्यक्तीने सोशल मीडियावरच तिला बलात्काराची धमकी दिली. यानंतर सर्वांनीच त्या व्यक्तीच्या विचारांवर आणि त्याच्या धमकीवर राग व्यक्त केला. बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करने मुंबई पोलीस, मुंबई पोलीस आयुक्त, आदित्य ठाकरे, मुख्यमंत्री, शिवसेना प्रवक्ता प्रियांका चतुर्वेदी यांना टॅग करून त्या व्यक्तीची तक्रार केली. ट्वीटमध्ये स्वराने लिहिले की, 'या व्यक्तीला तुरुंगात असायला हवं. हा एका मुलीला उघडपणे बलात्काराची धमकी देत आहे आणि दुसऱ्यांना असं करण्यासही सांगत आहे. आपण कोणत्या गोष्टीची वाट पाहत आहोत?' स्वरा भास्करचं ट्वीट रिट्वीट करत मराठी दिग्दर्शक समीर विद्वंसने लिहिले की, 'त्या मुलीने माफी मागितली. पण हा माणूस इतका गलिच्छ आहे की त्याने थेट बलात्काराची धमकी दिली. तो मुलीबद्दल एवढ्या वाईट शब्दात बोलत आहे आणि शेवटी महाराजांचं नाव घेत आहे. लाज नाही वाटत का.. आज महाराज जीवंत असतं तर त्याला कठोर शिक्षा दिली असती. त्याला लवकराच लवकर अटक करण्यात यावी.' दरम्यान, यूट्यूबर शुभम मिश्राविरोधात पोलिसांत तक्रार नोंदवली गेली. वडोदरा पोलिसांनी शुभमला अटक केल्याचंही सांगितलं. आरोपीविरोधात कलम २९४, ३५४ (अ) ५०४, ५०५, ५०६, ५०९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुभम मिश्रा हा एक प्रसिद्ध युट्यूबर आहे. अग्निमा जोशुआने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केल्याचं म्हणत तिच्याविरोधाक एक व्हिडिओ अपलोड केला. या व्हिडिओमध्ये त्याने अनेक आक्षेपार्ह गोष्टी बोलल्या. याचमुळे तो सोशल मीडियावर ट्रोलही झाला. दरम्यान, ठाणेचे शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी तरुणीला अटक करण्याची मागणी करत महाराष्ट्राचे गृहमत्री अनिल देशमुख यांना पत्रही लिहिले आहे. त्यांनी या संबधी ट्वीट करत लिहिलं की, 'छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या मुजोर कॉमेडियन अग्रीमा जोशुआला ताबडतोब अटक करण्यासंदर्भात मी गृहमंत्री मा. श्री. अनिल देशमुख यांना पत्र लिहिले आहे. आपण या विषयांची अत्यंत गंभीर दखल घेऊन असल्या विकृत कॉमेडियनला अटक करून कडक कायदेशीर कारवाई करावी अशी माझी मागणी आहे.'


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2WdTQjG