Full Width(True/False)

मराठमोळा तरुण 'मुकुंद मिश्रा'ची व्हायरल गोष्ट

या तरुणानं एकपात्री अभिनयातून साकारलेल्या '' या भूमिकेची सध्या सोशल मीडियावर खूप चर्चा आहे. इन्स्टाग्रामवर त्याच्या या व्हिडीओला नेटकऱ्यांनी तुफान प्रतिसाद दिलाय. आपल्या कौशल्याचा पुरेपूर उपयोग करून घेत मेहनत करायची तुमची तयारी असेल, तर तुम्ही कुठच्या कुठे जाऊ शकता याचं हे एक उदाहरण. अभिषेक तेली, रुईया कॉलेज प्रथमेश बर्गे नावाचा तरुण अशापैकीच एक. लॉकडाउनच्या काळात तो स्वत:च्या गावी गेला. तिथे असताना, आपली अंतिम वर्षाची होईल की नाही? आपल्या करिअरचं काय होणार? अभिनय ही आपल्या आवडीची गोष्ट असूनसुद्धा लॉकडाउनच्या काळात आपण अभिनयामध्ये काहीच केलं नाही...अशा एक ना दोन विचारांनी त्याचं मन अस्वस्थ झालं होतं. त्यातून एकपात्री अभिनयाचा आविष्कार दाखवणारा व्हिडीओ तयार करण्याची कल्पना त्याच्या डोक्यात आली. सोशल मीडियाच्या जमान्यात तरुण मंडळी पोस्ट, स्टोरीज पोस्ट करून, आम्ही तुमच्यासोबत आहोत असं आभासी चित्र उभं करते. परंतु प्रत्यक्षात खऱ्या मदतीची गरज भासते तेव्हा मात्र कोणीच मदतीला उभं नसतं, या गोष्टीला धरून प्रथमेशनं आपल्या एकपात्री अभिनयात 'मुकुंद मिश्रा' या कॉलेजवयीन मुलाचं काल्पनिक पात्र साकारलं. हा मुकुंद मिश्रा मूळचा उत्तर प्रदेशचा असतो. लॉकडाउनच्या काळात त्याची जीवनशैली आणि मानसिक स्थिती कशा प्रकारे बदलत जाते, लॉकडाउनमुळे त्याच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर कसा परिणाम होतो? त्यामुळेच विद्यार्थ्यांबरोबर आपल्या सर्वांच्या आयुष्यात शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्य किती महत्त्वाचं आहे यावर तो आपल्या व्हिडीओतून भाष्य करतो. 'मुकुंद मिश्रा' या एकपात्री अभिनयाच्या कथेचं लेखन-दिग्दर्शन प्रथमेशनं स्वतः केलं. यासाठी त्याला त्याचे अभिनयातील गुरू 'वामा गोर' यांचं मार्गदर्शन लाभलं. त्यामुळे हा व्हिडीओ अधिक प्रभावी झाला असं तो सांगतो. प्रथमेश हा मूळचा सातारा जिल्ह्यातील 'कोरेगाव' या गावचा. उच्च शिक्षणासाठी तो मुंबईत दाखल झाला. पुढे आजीकडे राहू लागला. अकरावी ते बारावीपर्यंतचं शिक्षण त्यानं मुंबईच्या एस.आय.इ.एस कॉलेजमधून पूर्ण केलं. पदवी शिक्षणासाठी त्यानं के. सी कॉलेजला विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. नंतर अनेक एकपात्री अभिनय, स्किट स्पर्धा तो करू लागला. आपण उत्तम अभिनय करू शकतो याची त्याला जाणीव झाली. मग आयएनटीमध्ये 'एच.बी १२०३' तर सृजन एकांकिका स्पर्धेत 'तो हरवलाय' या एकांकिकांमध्ये त्यानं अभिनय केला. 'मल्हार' फेस्टिव्हलमध्ये पथनाट्य आणि स्टेज प्लेमध्ये सहभाग घेतला. त्याचबरोबर वायू, प्रवाह, शाऊट या इंटरकॉलेजिएट फेस्टिव्हलमध्ये त्यानं एकपात्री अभिनयाचं प्रथम पारितोषिक पटकावलं. वामा गोर यांनी दिग्दर्शित केलेल्या आणि मेघा घाडगे मुख्य भूमिकेत असलेल्या 'घुंगरू' या लघुपटातसुद्धा त्यानं काम केलं आहे. प्रथमेशनं स्वतःच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर स्वतः साकारलेल्या 'मुकुंद मिश्रा' या काल्पनिक पात्राचा व्हिडीओ पोस्ट केला आणि तो तुफान व्हायरल झालाय. त्याच्या व्हिडीओला आतापर्यंत ४ दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. १८ हजारांहून अधिक लोकांनी त्यावर कमेंट केल्या आहेत. हा व्हिडीओ पोस्ट करण्याच्या आधी इन्स्टाग्रामवर त्याच्या फॉलोअर्सची संख्या केवळ ५०० च्या आसपास होती. परंतु या व्हिडीओनंतर ती १७ हजारांच्या पार गेली आहे. सहज पोस्ट केलेल्या व्हिडीओला अचानक मिळालेल्या प्रसिद्धीमुळे प्रथमेश स्वतः भारावून गेलाय. त्याचा अभिनय व त्याचा लूक पाहून त्याला अनेकांचे कॉल, मेसेज आले. 'आम्हाला हा खरा मुकुंद मिश्रा वाटला व कॅप्शन वाचून आमचा विश्वासच बसत नाही आहे की हे काल्पनिक पात्र असून प्रथमेश बर्गेनं ते साकारलं आहे', असं अनेकांनी त्याला सांगितलं. तर अनेकांनी, 'तुझ्यासारख्या अभिनेत्याची देशाला गरज आहे. तू रोजच्या आयुष्यातील सत्य घटनांवर आधारित विषयांवर लिहीत राहा आणि सादर करत राहा', असंही म्हटलं. येत्या काळात तो असे अनेक विषय व्हिडीओतून हाताळणार आहे. सोबत तो फिजिक्समध्ये एमएससीदेखील करणार आहे. भविष्यात मला सिनेक्षेत्रात खूप काम करायचं आहे. त्याचबरोबर भारताला ऑस्कर मिळवून देणाऱ्या एखाद्या चित्रपटात अभिनेता किंवा अगदी क्रू, स्पॉटबॉयच्या रुपानंसुद्धा माझा सहभाग असावा. त्या भारतीय चित्रपटाला ऑस्कर मिळताना मी तिथे उपस्थित राहून, माझ्या डोळ्यांनी तो क्षण अनुभवावा असं माझं स्वप्न आहे. - प्रथमेश बर्गे


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2ZS3gDX