Full Width(True/False)

वनप्लसच्या स्वस्त फोनची सेल आधीच बंपर डिमांड, रेकॉर्ड बनवला

जगप्रसिद्ध वनप्लस कंपनीने आपला आत्तापर्यंतचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन OnePlus Nord लाँच करून केवळ दोन दिवस झाले आहेत. २१ जुलै रोजी लाँच केलेल्या या फोनला जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. या फोनवरून मोठी क्रेझ पाहायला मिळत आहे. या फोनचा सेल सुरू होण्याआधीच या फोनचा एक रेकॉर्ड बनला आहे. लाखो युजर्स हा फोन खरेदी करण्यासाठी तयार आहेत. या फोनची अॅमेझॉन लिस्टिंग समोर आली आहे. OnePlus Nord सर्वात जास्त अँटीसिपेटेड फोन म्हणून समोर आला आहे. म्हणजेच या फोनची अनेकांना उत्सूकता आहे. ई-कॉमर्स साईट अॅमेझॉनवर फोनच्या समोर दिलेल्या 'Notify Me' बटनावर आपल्या ईमेलची एन्टर करून सर्वात जास्त युजर्संनी रिक्वेस्टची नोंदणी केली आहे. नवीन मिड रेंज स्मार्टफोनला कंपनी मागच्या महिन्यापासून टीझ करीत होती. तसेच अॅमेझॉनवर स्मार्टफोनच्या तुलनेत याची क्रेझ सर्वात जास्त पाहायला मिळत आहे. amazon.in वर 40 लाखांहून अधिक ग्राहकांनी फोन उपलब्ध करण्यासाठी त्यांना नोटिफिकेशन मिळावे यासाठी Notify Me बटनावर क्लिक केले आहे. अन्य फोनच्या तुलनेत हा एक नवीन रेकॉर्ड आहे...

कंपनीने नवीन स्वस्त फोन संबंधित हाइप तयार करण्यात कोणतीही कसूर ठेवली नाही. त्यामुळे या फोनची डिमांड प्रचंड वाढलेली दिसत आहे. ग्राहकांकडून या फोनसंबंधी जबरदस्त प्रतिक्रिया मिळत आहेत. जगभरात आधी AR लाँच होण्याआधी OnePlus Nord ची ब्लाइंड सेल करण्यात आली होती. ब्लाइंड सेलमध्ये अवघ्या काही मिनिटात हा फोन आउट ऑफ स्टॉक झाला होता. ब्लाइंड सेलमध्ये सहभागी झालेल्या ग्राहकांनी या फोनला लाँच होण्याआधीच खरेदी करण्यासाठी नोंदणी केली आहे. याप्रमाणे २०२० च्या सर्वात जास्त अँटिसिपेटेड (प्रतीक्षा) फोन म्हणून हा फोन समोर आला आहे.

नॉर्ड ची प्री बुकिंग पुन्हा एकदा २८ जुलै रोजी शॉपिंग साईटवर होईल. तसेच या फोनचा पहिला सेल ४ ऑगस्ट रोजी होणार आहे. डिव्हाईसवर ६ महिन्यांपर्यंत ईएमआय शिवाय ६ हजार रुयपांचे जिओ बेनिफिट्स आणि अमेरिकन एक्स्प्रेस कार्डवर २ हजार रुपयांपर्यंत सूट यासारखे ऑफर्स मिळत आहेत. या फोनची किंमत 6GB+64GB मॉडल 24,999 रुपये, 8GB+128GB व्हेरियंट 27,999 रुपये आणि 12GB+256GB मॉडल 29, 999 रुपयांत खरेदी करता येवू शकते. यात ब्लू मार्बल आणि ग्रे ऑनेक्स कलर मिळतील.

नवीन वनप्लस फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 765G प्रोसेसर मिळतो आहे. जो 5G कनेक्टिविटी ऑफर करतो. नुकताच कंपनीने OxygenOS 10.5.1 अपडेट देऊन याचा कॅमेरा परफॉरमन्स आणखी चांगला केला आहे. १०३ एमबीचा हा अपडेट फोन सेटअप केल्यानंतर युजर्संना मिळणार आहे. फोनमध्ये 48MP Sony IMX586 सेंसर दिला आहे. तसेच रियर पॅनेलवर क्वॉड कॅमेऱ्याचा सेटअप मिळत आहे. सेल्फीसाठी ड्यूल पंच होल मिळतो. हा फोन ६.४४ इंचाचा 90Hz AMOLED डिस्प्ले मिळतो. फोनला पॉवर देण्यासाठी यात 4165mAh बॅटरी दिली आहे. फोनला फास्ट चार्जिंगसाठी वार्प चार्ज 30T फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे.

OnePlus ने आपला स्वस्त स्मार्टफोनला लाँच केल्यानंतर त्याच दिवशी त्याच कार्यक्रमात OnePlus Buds अधिकृतपणे लाँच केले आहेत. हे कंपनीचे पहिले ट्रू वायरलेस इयरबड्स आहेत. या नवीन इयरबड्सची चर्चा आधीपासूनच सुरू होती. तसेच याची डिझाईन आणि फीचर्स संबंधित नवीन लिक्स आधीच समोर आली होती. भारतात वनप्लसच्या न्यू इयरबड्सची किंमत ४ हजार ९९० रुपये आहे. ही किंमत वनप्लसच्या इयरबड्सच्या मार्केटमध्ये उपलब्ध असलेल्या सर्वात स्वस्त प्रोडक्टमध्ये याचा समावेश करण्यात आला आहे. वनप्लसचे इयर बड्स ७ तासांच्या ऑडिओ प्लेबॅक टाइमसोबत येतात. चार्जिंग च्या अतिरिक्त बॅटरी मिळून हे ३० तासांपर्यंत पॉवर बॅकअप देते.



from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3jx9LUq