मुंबई- मॉडेल आणि अभिनेत्री दिव्या चौकसेचं कर्करोगाने निधन झालं. दिव्याने 'है अपना दिल तो आवारा' या सिनेमात काम केलं होतं. या सिनेमात तिच्यासोबत साहिल आनंदचीही महत्त्वपूर्ण भूमिका होती. दिव्या आणि साहिल सिनेमाच्या प्रदर्शनानंतरही एकमेकांना भेटायचे. दिव्याच्या निधनानंतर साहिलने तिच्याशी शेवटचं बोलणं काय झालं याबद्दल सांगितलं. साहिल म्हणाला की, मी आणि दिव्या सख्या भावंडांप्रमाणे रहायचो. ती मला साहिल दादा म्हणून हाक मारायची आणि मी तिला दिव्याय दीदी बोलायचो. गेल्याच आठवड्ययाच आमचं व्हिडिओ कॉलवर बोलणं झालं. तेव्हाही ती फार बोलू शकत नव्हती. दिव्याला वर्षभरापूर्वी स्वादुपिंडाचा झाला होता. दरम्यानच्या काळात ती बरीही झाली होती. पण काही काळाने कर्करोगाने पुन्हा डोकं वर काढलं. 'दादा... मला नाही वाटत आता माझ्याने अजून काही होईल.. मी काहीच खाऊ शकत नाहीये. पाइपमधून मला लिक्विड दिलं जातंय...' दरम्यान, मृत्यूपूर्वी दिव्या चौकसेने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक स्टोरी शेअर केली होती. यात तिने सर्वांचे आभार मानले होते. यासोबतच तिने आयुष्याला पूर्णविराम देत असल्याचंही म्हटलं होतं. दिव्याने लिहिले की, 'मला जे सांगायचं आहे त्यासाठी शब्द अपुरे पडत आहेत. महिन्याभरात मला अनेक मेसेज आले.. आता मला सांगावचं लागणार की मी मृत्यूशय्येवर आहे. आयुष्यात अनेक वाईट गोष्टी घडत असतात. मी लढवय्यी आहे. आशा करते पुढच्या जन्म कोणताही वेदना देणारा नसेल. कृपा करून प्रश्न विचारू नका. फक्त भगवंतालाच माहीत आहे की माझं तुम्हा सर्वांवर किती प्रेम आहे.' दिव्याने २०११ मध्ये मिस यूनिवर्स इंडिया पेजेन्टचा किताब जिंकला होता. यानंतर तिने काही म्युझिक व्हिडिओ आणि टीव्ही शोमध्ये कामं केली. एमटीव्हीच्या मेकिंग द कट २ मध्येही ती होती. २०१६ मध्ये आलेल्या है अपना दिल तो आवारा सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. याशिवाय तिने आलिया भट्ट आणि वरुण धवन स्टारर स्टूडन्ट ऑफ दि इअर सिनेमात साहिल आनंदसोबत काम केलं होतं. ती एक गायिकाही होती.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2ZYOOsw