Full Width(True/False)

फिरताना का घातलं नव्हतं मास्क, सैफने सांगितलं कारण

मुंबई- काही दिवसांपूर्वी अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर आणि त्याची पत्नी मुलगा तैमुरसह मरिन ड्राइव्हवर फेरफटका मारायला गेले होते. यावेळी त्यांनी तोंडाला मास्क लावला नव्हता. त्यांचे मरिन ड्राइव्हचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. यात तिघांच्याही तोंडावर मास्क नसल्याचं स्पष्ट दिसत होतं. याचमुळे त्यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं होतं. सैफ- करिना- तैमुरने लावले नव्हते मास्क? मुंबई मिररला दिलेल्या मुलाखतीत सैफने त्या तिघांनी मास्क का लावले नव्हते याचं कारण सांगितलं आहे. सैफ म्हणाला की, त्या तिघांनीही मास्क लावले होते. पण तिथे गेल्यावर त्यांनी पाहिलं की आसपास कोणीही नाही. यानंतर त्यांनी चेहऱ्यावरचे मास्क काढले. तिच एक वेळ होती जेव्हा आम्ही घराच्या बाहेर पाऊल टाकलं आणि आमच्यासोबत तैमुरला बाहेर घेऊन गेलो. कारण गेल्या तीन महिन्यांपासून तो घरातच होता. आमच्याजवळ मास्क होते. पण जेव्हा आम्ही आजूबाजूचा परिसर रिकामी पाहिला तेव्हा आम्ही मास्क काढून टाकले. यानंतर जसं आम्ही पाहिलं की, समोरून काही लोक येत आहेत आणि आम्हाला सांगण्यात आलं की मुलांना घराबाहेर काढण्याची परवानगी नाही तेव्हा आम्ही मास्क लावून घरी परतलो. या सर्व गोष्टी कोणी सांगितल्या नाही. आम्ही जबाबदार आणि कायदे पाळणारे नागरिक आहोत. लॉकडाउनमध्ये आम्ही घरीच होतो. आताही आम्ही फक्त कुटुंबातील व्यक्तींसोबतच बोलतो. मुंबईत करोना व्हायरसचे आकडे मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांना या विषाणूची लागण झाली आहे. सारा अली खानचा ड्रायव्हर करोना पॉझिटिव्ह आढळला होता. यावर सैफ म्हणाला होता की, करोना कोणालाही होऊ शकतो. यात सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे तुम्ही घरी रहाल आणि सुरक्षित रहालं. याआधी बच्चन कुटुंबातील चौघांना करोनाची लागण झाली असून अमिताभ, अभिषेक, ऐश्वर्या आणि आराध्या बच्चन नानावटी इस्पितळात उपचार घेत आहेत. दरम्यान, महाराष्ट्रातील करोना रुग्णांच्या संख्येनं आता ३ लाखांचा टप्पा पार केला आहे. त्यात सर्वाधिक रुग्ण मुंबईतील आहेत. रुग्णांच्या संख्येवरून विरोधी पक्षांनी नेहमीच सरकारवर टीका केली आहे. करोनाच्या चाचण्या पुरेशा होत नाहीत. रुग्णांची नेमकी संख्या आणि मृतांची आकडेवारी लपवली जाते, असा थेट आरोप विरोधी पक्षाच्या नेत्यांनी अनेकदा केला आहे. महाविकास आघाडी सरकारनं हे आरोप वेळोवेळी फेटाळले आहेत. 'वॉशिंग्टन पोस्ट'मधील एका वृत्तानं महाराष्ट्र सरकारच्या या दाव्याला बळ मिळालं आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3joB436