Full Width(True/False)

'या' मराठी अभिनेत्रीच्या वडिलांना करोनाची लागण

मुंबई: महाराष्ट्रात बाधित रुग्णांचा आकडा तीन लाखांचा टप्पा ओलांडून पुढे गेला आहे. सिनेसृष्टीतही अनेक सेलिब्रिटींना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री अभिनेत्री हिच्या व इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत ऋतुजानं यासंदर्भात चाहत्यांना सांगितलं आहे. ऋतुजासध्या होम क्वारंटाइन असून तिच्या वडिलांवर यशस्वी उपचार झाल्यानंतर ते देखील आता घरी परतले आहेत. 'दोन आठवडे खूपच तणावपूर्ण गेले. कारण बाबांची कोव्हीड१९ चाचणी पॉझिटिव्ह आली. मलासुद्धा सौम्य लक्षणं होती. बाबा रुग्णालयात आणि मी, आई, बहिण घरी क्वारंटाइन . चौघेही आता बरे आहोत. सांगायचं कारण हे म्हणजे काळजी घेऊन सुद्धा हा करेना कधी केव्हा कुठे कसा आमच्या भेटीला आला माहित नाही', असं तिनं तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. दरम्यान, राज्यात करोना बाधित रुग्णांचा आकडा तीन लाखांचा टप्पा ओलांडून पुढे गेला आहे. काल राज्यात तब्बल ९ हजार ५१८ नवीन रुग्णांची भर पडली आहे. राज्यातील करोना रुग्णांच्या संख्येनं आज उच्चांक गाठला असल्यानं आरोग्य प्रशासनाची झोप उडाली आहे. यासोबतच देशातील करोनाग्रस्त राज्यांत महाराष्ट्र पहिल्या स्थानी असल्यानं चिंता वाढली आहे. राज्यात काल दिवसभरात करोना संसर्गाच्या ९५१८ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर २५८ जणांना करोनाच्या संसर्गामुळं जीव गमवावा लागला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर ३. ८२ टक्के इतका असून एकूण करोना मृतांचा आकडा ११ हजार ८५४वर पोहोचला आहे. राज्यात एकूण ३ लाख १० हजार ४५५ रुग्ण करोनावर उपचार घेत असून १ लाख २८ हजार ७३० अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. सध्या राज्यात ७ लाख ५४ हजार ३७० व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत तर ४५ हजार ८४६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2E1MVUx