Full Width(True/False)

सुशांतच्या वकिलांचा मुंबई पोलिसांबाबत धक्कादायक खुलासा

मुंबई- सुशांतसिंह राजपूतच्या वडिलांनी मंगळवारी पटणा येथील पोलीस ठाण्यात त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीविरोधात एफआयआर दाखल केली. एएनआय या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, सुशांतच्या वकिलांनी एफआयआर दाखल करण्यात एवढा उशीर का झाला याचं स्पष्टीकरण दिलं आहे. एफआयआर दाखल करून घेत नव्हती. याशिवाय सुशांतच्या घरच्यांवर प्रॉडक्शन हाउसची नावं घेण्यासाठी दबाव टाकत होती. सुशांतच्या कुटुंबियांचे वकील विकास सिंह यांनी यावेळी अनेक धक्कादायक खुलासे केले. केस दाखल करण्यास ४४ दिवसांचा कालावधी फक्त याचसाठी लागला की, मुंबई पोलीस एफआयआर नोंदवून घेत नव्हती. याशिवाय पटणा पोलिसही पटकन तयार झाली नाही. मात्र मुख्यमंत्री नीतिश कुमार आणि मंत्री संजय झा यांच्या मध्यस्थीनंतर एफआयआर दाखल करण्यात आली. यासोबतच या घटनेची पुढील चौकशी पटणा पोलिसांनी करावी अशीही सुशांतच्या वडिलांची इच्छा आहे. कुटुंबाने अजून सीबीआय चौकशीची मागणी केली नाही. पटणा पोलिसांचाही आला जबाब सुशांतच्या वडिलांच्या वकिलांनी यावेळी बिहारचे मुख्यमंत्र्यांचेही आभार मानले. तसेच पटणाचे सिटी एसपी विनय तिवारी म्हणाले की, आता एफआयआर दाखल झालंय. प्राथमिक चौकशीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे कोणावर प्रश्न उपस्थित करायचे यावर बोलणं योग्य राहणार नाही. सुशांतच्या वडिलांनी ज्या ज्या नावांचा उल्लेख केला त्या सर्वांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. दरम्यान, रियाने आता तिची बाजू मांडण्यासाठी देशातील सर्वात मोठ्या आणि महागड्या वकिलाची नियुक्ती केली आहे. आता तिची ही केस लढणार आहेत. याआधी मानेशिंदे यांनी सलमान खान आणि संजय दत्तची केस सांभाळली होती. मंगळवारी रियाच्या घरी दिसली होती वकिलांची टीम रिपोर्ट्सनुसार, मानेशिंदे यांनी अंतरिम जामीनसाठी मंगळवारीच पेपर्स पुढे केले होते. यानंतर कनिष्ठ वकील आनंदिनी फर्नांडिसला रियाच्या घरी पाहण्यात आलं. सुशांतच्या वडिलांनी सात पानी एफआयआरमध्ये सुशांतच्या अकाउंटमधून १५ कोटी रुपये ट्रान्सफर केल्याची माहिती दिली होती. रिया आणि तिचं कुटुंब जाणीवपूर्वक सुशांतला मानसिकरित्या आजारी असल्याचं दाखवत होते असंही म्हणाले.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/333znCm