Full Width(True/False)

रियाच्या वडिलांच्या फ्लॅटवर रजिस्टर्ड होत्या सुशांतच्या कंपन्या!

मुंबई- सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी सुशांतचे वडील केके सिंह यांनी आणि तिच्या कुटुंबियांविरोधात एफआयआर दाखल केल्यानंतर रियाच्या संकटात वाढ झाली आहे. पटणामध्ये दाखल केलेल्या तक्रारीत सुशांतच्या वडिलांनी रियावर सुशांतचे पैसे स्वतःकडे घेण्याचा तसेच त्याला आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्याचे गंभीर आरोप केले आहेत. यात सुशांतच्या एक्स- गर्लफ्रेंडने अंकिता लोखंंडेनेही सुशांत रियासोबत खूश नव्हता अशी माहिती बिहार पोलिसांना दिली. या सर्व गोष्टींमुळे रियाच्या भोवती अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. आता या प्रकरणी अजून एक माहिती समोर येत आहे. यातही रिया आणि तिचं पूर्ण कुटुंब गुंतलेलं असल्याचं दिसतं. दोन कंपन्यांचा डायरेक्टर होता सुशांत सुशांत Vividrage RhealityX Pvt Ltd आणि Front India for World Foundation या दोन कंपन्यांचा डायरेक्टर होता. या दोन्ही कंपन्या नवी मुंबईतील उलवे येथे स्थित होत्या. उलवे येथील 'साई फॉर्च्यून' इमारतीतील फ्लॅट नंबर ५०३ येथे या दोन्ही कंपन्या रजिस्टर होत्या. रियाच्या वडिलांच्या नावावर फ्लॅट हा फ्लॅट रियाच्या वडिलांच्या यांच्या नावावर होता. विशेष म्हणजे या फ्लॅटवर कधीही रिया किंवा तिच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती आली नाही आणि सुशांतनेही हा फ्लॅट कधी पाहिला नाही. असं असताना कंपन्या या फ्लॅटवर का रजिस्टर करण्यात आल्या हा प्रश्न उपस्थित होतो. तसेच हा फ्लॅट रियाच्या वडिलांच्या नावावर का आहे हा मुद्दाही उपस्थित केला जात आहे. रियाने कंपनीच्या नावात जोडलं स्वतःचं नाव रिपोर्टनुसार, सुशांतची पहिली कंपनी Vividrage RhealityX Pvt Ltd साठी रिया इतकी उत्साही होती की तिने स्वतःचं नाव या कंपनीच्या नावाशी जोडलं. याशिवाय सुशांतच्या वडिलांनी मुलाच्या अकाउंटवरून जवळपास १५ कोटी रुपयांची हेराफेरी केल्याचा आरोप केला. आता ही रक्कम या कंपन्यांसाठीच रिया आणि शोविककडे होती हा हा प्रश्न उपस्थित होतो. सध्या पोलीस या प्रकरणाची कसून चौकशी करत आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2X9Q7nQ