Full Width(True/False)

खुलता कळी खुलेना... मयुरी आणि आशुतोषची लव्हस्टोरी

मुंबई: काल म्हणजेच बुधवारी २९ जुलै रोजी मराठी सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला. अभिनेता आणि अभिनेत्री हिचा पती आशुतोष भोकरे यानं आत्महत्या केली. नांदेड इथल्या राहत्या घरी गळफास लावून त्यांनं जीवन संपवलं. त्याच्या आत्महत्येनं त्याच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. आशुतोषच्या आत्महत्येचं कारण अद्यापही समोर आलं नाही. मयुरी आणि आशुतोषमध्ये काही मतभेद नव्हे; असं त्याच्या एका जवळच्या व्यक्तीनं सांगितलं असून आशुतोषच्या आत्महत्येचा पोलिस सध्या तपास करत आहेत. २० जानेवारी २०१६ रोजी मयुरी आणि आशुतोष विवाहबद्ध झाले होते. त्यांच्या लग्नाचे फोटोही सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. त्याच्या लग्नाच्या दुसऱ्या वाढदिवसानिमित्तानं मुयरीनं एक सोशल मीडियावर पोस्ट केली होती. तर एका मुलाखतीदरम्यानं मयुरीनं तिची आणि आशुतोषची लव्हस्टोरी देखील सांगितली होती. मयुरी आणि आशुतोषचं खरं तर अरेंज मॅरेज म्हणता येईल. दोघं एकमेकांना ओळखतही नव्हते. मयुरीचे वडिल निवृत्त झाल्यानंतर एका पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. मुयरीच्या मानलेल्या भावांना यांचं लग्न व्हावं अशी इच्छा होती. त्यांनी आशुतोषला देखील पार्टीला बोलवलं होतं. आशुतोष त्याचे वडिल आणि मामांसोबत या पार्टीला आला होता. या पार्टीमध्ये त्यानं मयुरीला पाहिलं आणि तो तिच्या प्रेमात पडला. मयुरीनं देखील आशुतोषला पार्टीतच पहिल्यांदा पाहिलं होतं. दोन दिवसांनी मयुरीच्या घरच्यांनी तिला आशुतोषबद्दल विचारलं. तुला कसं वाटला वैगेरे.. पण मयुरीला लग्न करण्यात रस नव्हता. तिनं घरच्यांना हा विषय इथंच बदं करा असं सांगितलं होतं. दोन-तीन महिने गेले. आशुतोषनं योग्य वेळ यायची वाट पाहिली. मयुरीच्या घरच्यांनी तिला एकदा तरी आशुतोषला भेटून बघ असं सांगितलं होतं. आशुतोषला एकदाच भेटेन या अटीवर मयुरी आणि आशुतोषची भेट झाली होती. एका तासात आशुतोषला भेटून परत यायचं असंच मयुरीनं ठरवलं होतं.पण पहिल्याच भेटीत त्या दोघांनी तब्बल पाच तास गप्पा मारल्या. पहिल्याच भेटीत आशुतोषनं मयुरीला लग्नाची मागणी घातली होती. पहिल्या भेटीतचं तू मला लग्नाची मागणी का घालतोय, असं मयुरीनं त्याला विचारलं होतं. 'मी तुला पहिल्यांदा पार्टीत पाहिलं तेव्हाच तू मला आवडली होती. लहान-मोठ्यांसोबत तुझं वागणं पाहिलं होतं. एक व्यक्ती म्हणून त्याच दिवशी मी तुला ओळखलं',असं आशुतोष म्हणाला होता. त्यानंतर होकार असू दे किंवा नकार..नक्की कळव, असं तो म्हणाला. यानंतर मयुरीनं आशुतोषसोबत लग्न करायला होकार दिला होता. त्यानंतर सात ते आठ महिन्यांनंतर मयुरी आणि आशुतोष यांचं धुमधडाक्यात लग्न झालं होतं.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/33apdAa