नवी दिल्लीः शाओमी इंडिया जवळपास एका आठवड्यापासून आपाला रेडमी ९ सीरीजचा नवीन प्राईम डिव्हाईसचा टीज करीत आहे. कंपनीची प्रसिद्धी रेडमी सीरीज मध्ये ऑगस्ट च्या पहिल्या आठवड्यात चा समावेश होत आहे. लीक्सच्या माहितीनुसार, हा बजेट फोन असून यात अनेक स्पेशल फीचर्स सोबत भारतीय मार्केटमध्ये हा फोन येवू शकतो. कंपनीचा हा फोन बजेट सेगमेंटमध्ये सध्या उपलब्ध असलेल्या फोनला टक्कर देणार आहे. वाचाः Redmi 9 Prime ला ४ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता एका डिजिटल कार्यक्रमात लाँच करण्यात येणार आहे. रेडमीकडून नवीन डिव्हाईसचे नाव शेयर करण्यात आले आहे. बाकी फीचर्स संबंधीत माहिती समोर आली नाही. इंटरनेटवर शेयर करण्यात येत असलेल्या टीजर्सनुसार, हा फोन युरोपमध्ये लाँच केलेल्या रेडमी ९ चा रिब्रँडेड मॉडल असू शकते. यात दमदार फीचर्स फोन मिळू शकतो. वाचाः नॉचड्रॉपचा मोठा डिस्प्ले सोशल मीडियावर दिसत असलेल्या टीजर च्या माहितीनुसार, फोनमध्ये स्लीम बैजल्सचे ड्रॉपनॉच डिस्प्ले मिळणार आहे. अॅमेझॉनवर दिसत असलेल्या आणखी एका टीजरवरून फोनमध्ये यूएसबी टाईप सी पोर्ट आणि ३.५ एमएम हेडफोन जॅक कन्फर्म झाले आहे. २०१६ नंतर पहिल्यांदा कंपनी फोनमध्ये प्राईम नावाचा वापर करीत आहे. २०१६ मध्ये Redmi 3S Prime असे अखेरचे नाव दिले होते. वाचाः किंमत किती असू शकते गेल्या वर्षी लाँच करण्यात आलेल्या रेडमी ८ ला रिप्लेस करु शकतो. रेडमी ८ ची किंमत ९९९९ रुपये आहे. तसेच नवीन मॉडल याच किंमतीत येण्याची शक्यता आहे. या फोनमध्ये ६.५ इंचाचा डिस्प्ले, 5020mAh बॅटरी आणि 13MP क्वॉड कॅमेरा यासारखे फीचर्स मिळू शकतात. मीडियाटेक प्रोसेसर शिवाय याला अनेक व्हेरियंट्स मध्ये आणले जावू शकते. वाचाः वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3k4r93c