मुंबई: अभिनेता याच्या आत्महत्येचा तपास करण्यासाठी बिहार पोलिसांची एक टीम मुंबईत दाखल झाली असून आतापर्यंत सुशांतच्या जवळील व्यक्तीची चौकशी त्यांनी केली आहे. सुशांतची बहिण मीतू सिंह, एक्स गर्लफ्रेंड यांची चौकशीनंतर सर्वात जवळचा मित्र याची चौकशी देखील बिहार पोलिसांनी केली आहे. चौकशीदरम्यान महेशनं अनेक धक्कादायक माहिती पोलिसांना दिली आहे. सुशांतच्या वडिलांनी एफआयआरमध्ये विरोधत केलेल्या आरोपांनाही महेशनं दुजोरा दिला आहे. रिया आणि तिची आई सुशांतच्या आयुष्यातील प्रत्येकगोष्टीत हस्तक्षेप करायची असं महेशनं म्हटलं आहे. रिया आणि तिच्या आईनं सुशांतच्या घरातील सर्व कर्मचारी बदलले होते. सुशांतला त्याच्या घरच्यांसोबत बोलण्यातही दोघींनी बंधनं असायची. मित्र किंवा घरच्यांच्यासोबत बोलल्या नंतर सुशांत त्याचा फोन रिसेट करायचा असं महशे शेट्टीनं बिहार पोलिसांना सांगितलं आहे. इतकंच नव्हे तर लॉकडाऊन सुरू होण्यापूर्वी रियानं त्याच्या बॉडिगार्डला देखील कामावरून काढून टाकलं होतं. सुशांत आणि महेश यांचं शेवटचं बोलणं हे आत्महत्येच्या एक दिवसापूर्वी म्हणजेच १३ जून रोजी झाल्याचंही महेशनं पोलिसांना सांगितलं. तसंच सुशांतला कुर्ग इथं महेशसोबत ऑरगॅनिक शेत करण्याची इच्छा होती. परंतु रियानं त्याला विरोध केला होता.असंही महेशनं सांगितलं.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2DkQhBJ