चैन्नई- दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सुपरस्टार धनुषचा आज त्याचा ३७ वा वाढदिवस साजरा करत आहे. रजनीकांतचा हा जावई त्यांच्यासारखाच स्टारडममध्ये अव्वल आहे. २८ जुलै १९८३ मध्ये तमिळनाडूमध्ये धनुषचा जन्म झाला. धनुषचे वडील कस्तूरी राजा स्वतः दिग्दर्शक आहेत. त्यांच्या दिग्दर्शनात बनलेल्या 'थुल्लुवाधो इलामाई' सिनेमातून त्याने सिनेक्षेत्रात पदार्पण केलं. २००३ मध्ये आलेला त्याचा 'तिरुदा तिरुदी' सिनेमा ब्लॉकबस्टर होता. या सिनेमानंतर धनुषला सिनेसृष्टीत ओळख मिळू लागली. त्याच्या एका सिनेमासाठी ७ ते १० कोटी रुपये घेतो. याशिवाय अन्य जाहिरातींमधूनही त्याची कमाई होत असते. २०११ मध्ये आलेल्या 'आदुकलम' सिनेमासाठी त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. फार कमी लोकांना माहीत आहे की, धनुषला कधीच अभिनेता व्हायचं नव्हतं. त्याला शेफ होण्याची इच्छा होती. यासाठी त्याने हॉटेल मॅनेजमेन्टचा कोर्स करण्याचाही विचार केला होता. याबद्दल सांगताना धनुष म्हणाला की, 'वडील दिग्दर्शक होते. घरी जेव्हाही कोणता अभिनेता यायचा मी माझ्या खोलीत जाऊन लपायचो. पण नंतर वडील आणि भावाच्या सांगण्यावरून सिनेमात नशीब आजमावयाचं ठरवलं.' २००४ मध्ये धनुषने रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्याशी लदग्न केलं. ऐश्वर्या आणि धनुषची पहिली भेट एका शोदरम्यान झाली. धनुषची बहीण ऐश्वर्याची चांगली मैत्रीण होती. दोघांच्या अफेअरच्या चर्चा जेव्हा सुरू झाल्या तेव्हा घरच्यांनी दोघांना याबद्दल विचारलं आणि नंतर लग्नाची घोषणा केली. धनुषने ऐश्वर्याशी लग्न केलं तेव्हा तो फक्त २१ वर्षांचा होता आणि ऐश्वर्या २३ वर्षांची होती. दोघांच्या लग्नाला १५ वर्ष झाली आहेत आणि दोघांना दोन मुलंही आहेत. धनुषचं स्टारडम अगदी सासऱ्याप्रमाणेच आहे. चैन्नईमध्ये त्याचा पम्मल येथे एक आलीशान बंगला आहे. या बंगल्याची किंमत जवळपास २० कोटींपेक्षा जास्त आहे. २०१३ मध्ये त्याने हे घर विकत घेतलं होतं. याशिवाय एक गेस्ट हाउसही आहे. एवढंत नाही तर त्याच्याकडे अनेक लग्झरी गाड्या आहेत. त्याच्याकडे ऑडी A8, Bentley Continental Flying Spur, Jaguar XE, Rolls-Royce Ghost Series - II अशा एकाहून एक महागड्या गाड्या आहेत. या गाड्यांची सुरुवातीची किंमत ५ कोटींहून जास्त आहे. विशेष म्हणजे या सर्व गोष्टी धनुषने स्वबळावर कमावल्या आहेत.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2DgPiSU