Full Width(True/False)

गॅलेक्सी नोट २० ची किंमत लिक, ५ ऑगस्टला लाँचिंग

नवी दिल्लीः सॅमसंग ५ ऑगस्टला होणाऱ्या गॅलेक्सी अनपॅक्ड () इवेंटमध्ये ५ नवीन डिव्हाईस घेऊन येण्याची तयारी करीत आहे. कंपनीने या पाच डिव्हाईसची झलक दाखवली आहे. ज्यात सीरीज च्या स्मार्टफोनचा समावेश आहे. डिझाईन समोर आल्यानंतर आता या फोन्सची किंमत लीक झाली आहे. वाचाः प्रसिद्ध टिप्सटर इशान अग्रवालने युरोपियन बाजारात सॅमसंग आणि गॅलेक्सी नोट अल्ट्राची किंमत किती असू शकतो. भारतात गॅलेक्सी नोट २० सीरीजची विक्री २८ ऑगस्ट रोजी सुरू होऊ शकतो. या फोनच्या किंमतीची घोषणा ५ ऑगस्टला करण्यात येणार आहे. वाचाः गॅलेक्सी नोट २० ची किंमत किती असू शकते इशान अग्रवालच्या माहितीनुसार, यूरोपमध्ये गॅलेक्सी नोट २० ४जी बेस व्हेरियंटची किंमत ९९९ यूरो (जवळपास ८७ हजार ७०० रुपये), गॅलेक्सी नोट २० च्या मॉडलची किंमत १०९९ यूरो (९६ हजार ५०० रुपये) आणि नोट २० अल्ट्रा ५ जीची सुरुवातीची किंमत १३४९ यूरो (जवळपास १ लाख १८ हजार ५०० रुपये) असू शकते. वाचाः काय असणार खास या फोनच्या वैशिष्ट्यावर एक नजर टाकल्यास सॅमसंग गॅलेक्सी नोट २० सीरीज मध्ये Snapdragon 865 प्रोसेसर दिला जावू शकतो. गॅलेक्सी नोट २० अल्ट्रा मध्ये QHD+ डिस्प्ले दिला जाणार आहे. जे 120Hz रिफ्रेश रेट सोबत येईल. गॅलेक्सी नोट २० मध्ये येणाऱ्या फुल एचडी प्लस डिस्प्ले 60Hz रिफ्रेश रेट सोबत येईल. गॅलेक्सी नोट २० अल्ट्राचे खास वैशिष्ट्ये म्हणजे यात १०८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा दिला जाणार आहे. रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला आहे की, हा सीरिजचा पहिला आणखी एक फोन गॅलेक्सी नोट २० प्लस येईल. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3308eQQ