मुंबई- सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी प्रसिद्ध दिग्दर्शक यांना आज दुपारी १२ वाजता हजर राहण्याचा समन्स दिला होता. सांताक्रूझ पोलीस ठाण्यात भट्ट यांची चौकशी करण्यात आली. जवळपास दोन तास त्यांना सुशांतसिंह प्रकरणी प्रश्न विचारण्यात आले. महेश भट्ट यांना सुरुवातीला वांद्रे पोलीस ठाण्यात जायचे होते. मात्र तिथे मीडियाची असलेली उपस्थिती पाहून त्यांना सांताक्रूझ पोलीस ठाण्यात जबाब नोंदवून घेण्याची विनंती केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भट्ट यांना सुशांत आणि रिया चक्रवर्तीच्या नात्याबद्दल तसेच सिनेमांशी निगडीत अनेक बाबींवर प्रश्न विचारण्यात आले. भट्टांच्या जबाबानंतर सुशांतच्या केसला एक वेगळा पैलू मिळू शकतो असे पोलिसांना वाटते. महेश भट्टांशिवाय धर्मा प्रोडक्शनचे सीईओ अपूर्व मेहताचीही लवकच चौकशी होणार आहे. बड्या सेलिब्रिटींच्या जबाबातून सुशांतविरोधात बॉलिवूडमध्ये कोणी गटबाजी केली होती याचा शोध घेण्यास मदत होईल. तसेच गरज पडली तर करण जोहरचाही जबाब नोंदवण्यात येईल असे अनिल देशमुखांनी सांगितले. पाहा व्हिडिओ: एकीकडे मुंबई पोलिसांनी बड्या सेलिब्रेटींचे जबाब नोंदवायला सुरुवात केली आहे तर दुसरीकडे कंगना रणौतने एका टीव्ही मुलाखतीत अनेक मोठे खुलासे केले आहेत. यात तिने आदित्य चोप्रा, आणि महेश भट्ट यांची नावं घेतली. महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं की, आतापर्यंत ३७ हून जास्त लोकांचे यासंबंधी जबाब घेण्यात आले आहेत. महेश भट्ट यांच्यानंतर करण जोहरचा मॅनेजर आणि कंगना रणौतचाही जबाब लवकरच नोंदवण्यात येईल असे ते म्हणाले. दरम्यान, महेश भट्ट यांच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या सुहरिता दासने यासंबंधी फेसबुक पोस्ट करत रिया चक्रवर्तीशी निगडीत अनेक खुलासे केले होते. सुशांत आणि तिच्या नात्याविषयी रिया महेश यांच्याकडून सल्ले घ्यायची. सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी मुंबई पोलिसांनी आतापर्यंत रिया चक्रवर्ती, संजना संघी, संजय लीला भन्साळी, राजीव मसंद, रोहिनी अय्यर, मुकेश छाब्रा, आदित्य चोप्रा, रूमी जाफरी यांचे जबाब नोंदवून घेतले आहेत.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2P5usIR