Full Width(True/False)

मृत्यूनंतर सुशांतने आलिया- करणला केलं फॉलो

मुंबई- अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूनंतर त्याचे चाहते सतत स्टारच्या मृत्यूची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी करत आहेत. फक्त चाहतेच नाही तर शेखर सुमन, रूपा गांगुली यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनीही हीच मागणी केली आहे. या सर्वांच्यामते सुशांतने आत्महत्या केली नसून त्याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. सध्या या आत्महत्येचा तपास करत आहे. तर सोशल मीडियावर सुशांतचे चाहतेही त्यांच्यापरिने मृत्यूचा छडा लावण्याचा प्रयत्न करत आहे. नक्की चाललंय तरी काय- मृत्यूपूर्वी सुशांतने आलिया भट्टला सोशल मीडियावर कधीच फॉलो केलं नाही. पण त्याच्या मृत्यूनंतर मात्र सुशांतच्या अकाउंटवरून आलियाला फॉलो केल्याचे नोटिफिकेशन यायला सुरुवात झाली. एका ट्विटर यूझरने स्क्रिनशॉट शेअर करत म्हटले की, त्याला हे नोटिफिकेशन जुलै महिन्यात मिळालं. यात स्पष्ट दिसतं की सुशांतच्या अकाउंटवरून आलिया भट्टला फॉलो करण्यात आलं आहे. आता अनेक यूझर्स यावर प्रश्न उपस्थित करत आहेत. यात सुब्रमण्यम स्वामी, गृहमंत्री अमित शहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही टॅग करण्यात आले आहे. यूझर्सने शेअर केले स्क्रिनशॉट- यानंतर अनेक यूझर्सने त्यांना आलेलया नोटिफिकेशनचे अनेक स्क्रिनशॉट सोशल मीडियावर शेअर केले. यासोबतच #ArrestMurdererOfSushant #justiceforSushantforum या हॅशटॅगचाही मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला. फक्त आलियाचं नाही तर सुशांतच्या अकाउंटवरून करण जोहरला फॉलो केल्याचंही नोटिफिकेशन यूझर्सना मिळाले. १ जुलैला मिळालेल्या नोटिफिकेशनमध्ये सुशांतने महेश भट्ट आणि आलियाला फॉलो केल्याचं नोटिफिकेशन पहिलं आलं. विशेष म्हणजे मृत्यूआधी सुशांतने या दोघांना ट्विटरवर कधीच फॉलो केलं नाही. यासोबतच त्याच्या इन्स्टाग्रामवरून अनेक सेलिब्रिटींची नावं काढण्यात आली आहेत. सर्वांचं एकच म्हणणं- सोशल मीडियावर अशा अनेक पोस्ट आहेत ज्यात सर्वांनी ही एकच गोष्ट वारंवार सांगितली आहे. सर्वांनी स्क्रिनशॉट शेअर करून एकच प्रश्न विचारला की, सुशांतच्या मृत्यूनंतरही त्याच्या अकाउंटवरून नोटिफिकेशन कसे येतात. यासोबतच त्याचा फोन नक्की कोण वापरत आहे असा प्रश्नही त्यांना पडला. यामुळेच मुंबई पोलीस आणि मीडिया लोकांपासून काही लपवत असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3fIsWbv