Full Width(True/False)

सुशांतच्या फॉरेन्सिक चाचणीचा व्हिडिओ झाला लिक

मुंबई- सुशांतसिंह राजपूतला जाऊन आता दिड महिन्यांहून अधिकचा काळ लोटला. सुशांतच्या वडिलांनी केके सिंह यांनी अभिनेत्री रिया चक्रवर्तीविरोधात मंगळवारी एफआयआर दाखल केली. यात स्पष्ट शब्दात सिंह यांनी सुशांतला आत्महत्येसाठी उकसवण्याचा आरोप केला. सध्या एफआयआरची कॉपी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एवढंच नाही तर सुशांतच्या फॉरेन्सिक चाचणीचा व्हिडिओही टाइम्स नाउच्या हाती लागला आहे. हा व्हिडिओ ऑनलाइन व्हायरल होत आहे. यात अधिकारी स्पष्ट शब्दात म्हणतो की, व्हिडिओ लिक होता कामा नये, नाहीतर आपला सगळा तपास व्यर्थ होईल. व्हायरल झाला व्हिडिओ सुशांतच्या मृत्यूनंतर त्याच्या मृतदेहाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता फॉरेन्सिक चाचणीचाही व्हिडिओ समोर आला आहे. इथे पाहा व्हिडिओ- बहिणीनेही केली न्याय मिळवण्याची मागणी- सुशांतसिंह राजपूतच्या बहिणीने श्वेता सिंहनेही सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत भावाला न्याय मिळवून देण्याची मागणी केली. यासोबतच सुशांतच्या वडिलांनी रियाविरोधात एफआयआर दाखल करत तिने सुशांतच्या पैशांवर सर्व हक्क ठेवला होता. यासोबतच तिने सुशांतचा आजार मीडियासमोर लिक करण्याची धमकीही त्याला दिली होती. सुशांतच्या वडिलांना रियाच्या कुटुंबियावरही आरोप केला आहे. त्या सर्वांचा सुशांतच्या आयुष्यात फार दखल होता. ज्यामुळे तो स्वतःच्या कुटुंबियांपासून दूर झाला होता. नोंदवला गेला रियाचा जबाब रिया अनेक दिवस सुशांतच्याच घरी राहत होती. सुशांतने आत्महत्या करण्याच्या काही दिवसआधी तिनं सुशांतचं घर सोडलं होतं. सुशांतनंच तिला घरातून निघायला सांगितलं होतं. सुशांतच्या हत्येनंतरचाही रियाचा जबाब मुंबई पोलिसांनी नोंदवून घेतला आहे. जवळपास ११ तास पोलिसांनी तिची चौकशी केली. रियानं केली सीबीआय चौकशीची मागणी रियानं इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. अमित शहा सर, मी सुशांतची गर्लफ्रेंड. सुशांतच्या अकस्मात निधनाला आता एक महिना होऊन गेलाय. माझा सरकारवर पूर्ण विश्वास आहे. सुशांतला न्याय मिळावा यासाठी हात जोडून विनंती करते की, या प्रकरणाची सीबीआय द्वारे तपास करण्यात यावा. मला फक्त एकच गोष्ट जाणून घ्यायची आहे ती म्हणजे सुशांतवर अशा कोणत्या प्रकारचा दबाव होता ज्यामुळं त्यानं इतकं टोकाचं पाऊल उचललं आहे', असं रियानं तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/39BXHfR