नवी दिल्लीः युजर्संना आकर्षित करण्यासाठी नवीन नवीन प्लान ऑफर करतात. डिसेंबर २०१९ मध्ये टॅरीफ महाग केल्यानंतर युजर्संना प्रीपेड प्लानसाठी जास्त पैसे खर्च करावे लागत आहेत. त्यामुळे जास्त बेनेफिट्सच्या स्वस्त प्लानची डिमांड वाढली आहे. त्यामुळे कंपन्यांनी आता अनेक स्वस्त प्लान ऑफर करीत आहे. या ठिकाणी आम्ही तुम्हाला रिलायन्स जिओ, एअरटेल आणि व्होडाफोनचे काही स्वस्त प्लानसंबंधी माहिती देत आहोत. या प्लानमध्ये डेटा आणि कॉलिंग बेनिफिट्स देतात. तसेच या प्लानची सुरुवात १९ रुपयांपासून सुरूवात होते. वाचाः एअरटेलचा १९ रुपयांचा प्लान एअरटेलच्या पोर्टफोलियोत हा सर्वात स्वस्त प्लान आहे. जो डेटा आणि कॉलिंग सोबत येतो. दोन दिवसांची वैधता असलेल्या या प्लानमद्ये देशात कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग सेवा मिळते. इंटरनेट ब्राउझिंगसाठी या प्लानमध्ये तुम्हाला २०० एमबी डेटा मिळतो. प्लानमध्ये एसएमएसची सुविधा दिली जात नाही. वाचाः एअरटेलचा १२९ रुपयांचा प्लान २४ दिवसांची वैधता असलेल्या या प्लानमध्ये कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग दिली जात आहे. प्लानमध्ये १ जीबी डेटा सोबत ३०० फ्री एसएमएस ऑफर केले जात आहे. या प्लानमध्ये झी५ प्रीमियम, एअरटेल एक्स्ट्रीम आणि विंक म्युझिकचे फ्री सब्सक्रिप्शन दिले जातात. व्होडाफोनचा १९ रुपयांचा प्लान दोन दिवसांची वैधता या प्लानमध्ये मिळते. कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग मिळते. इंटरनेटसाठी तुम्हाला २०० एमबी डेटा मिळतो. प्लानचे खास वैशिष्ट्ये म्हणजे यात ४९९ रुपयांच्या किंमतीचे व्होडाफोन प्ले आणि ९९९ रुपये किंमतीचे झी ५ चे फ्री सब्सक्रिप्शन मिळते. वाचाः व्होडाफोनचा १२९ रुपयांचा प्लान ३०० फ्री एसएमएस आणि २ जीबी डेटा सोबत या प्लानमध्ये कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड लोकल आणि एसटीडी कॉलिंगची सुविधा दिली जाते. या प्लानची वैधता २४ दिवसांची आहे. या प्लानमध्ये व्होडाफोन प्ले आणि झी ५ चे सब्सक्रिप्शन फ्री मिळते. जिओचा १२९ रुपयांचा प्लान रिलायन्स जिओच्या या प्लानची वैधता २८ दिवसांची आहे. या प्लानमध्ये ३०० फ्री एसएमएस सोबत एकूण २ जीबी डेटा दिला जातो. प्लानच्या सब्सक्रायबर्स जिओ नंबर्सवर अनलिमिटेड कॉलिंग करू शकतात. तर अन्य नेटवर्क्सवर कॉल करण्यासाठी या प्लानमध्ये १ हजार नॉन जिओ मिनिट्स मिळतात. या प्लानमध्ये जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन दिले जातात. वाचाः वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/302XgXQ