Full Width(True/False)

बेरोजगारांना सोनू सूद देणार काम, द्यावा लागणार नाही पैसा

मुंबई- सोनू सूदने गेल्या काही महिन्यात हजारो स्थलांतरीत मजूरांना त्यांच्या घरी पोहोचवण्यासाठी मदत केली. लॉकडाउनमध्ये तो अनेक लोकांसाठी सुपरहिरो झाला होता. प्रत्येकाच्या तोंडी फक्त सोनूचंच नाव होतं. अजूनही अनेकप्रकारे तो गरजूंची मदत करत असतो. घरी परतलेल्या बेरोजगार लोकांची संख्या १ लाखांपेक्षा जास्त झाली आहे. अशा लोकांसाठी सोनूने एक अॅप सुरू केलं आहे. 'प्रवास रोजगार अॅप' असं या अॅपचं नाव आहे. यातून कलाकारांना रोजगार मिळवण्यास मदत होईल. सोनूने सांगितले की, 'गावी पोहोचल्यानंतर आजा कामगार रोजगाराच्या शोधात आहेत. सध्याच्या काळात हे कठीण आहे. स्थलांतरीत मजुरांना काम देण्याची केंद्र सरकारची योजना आहे. पण मला वाटतं की, यावर दीर्घकाळ उपाययोजनांची गरज आहे. या कामगारांना शहर, जिल्ह्यांमध्ये काम मिळणं गरजेचं आहे. त्यांना त्यांच्या गावीच काम देण्याचा मी आता प्रयत्न करेन.' पाच भाषांमध्ये येणार हे अॅप या कामांसाठी सोनूने त्याच्या इंजीनिअरिंगमधल्या मित्रांची मदत घेतली. अनेक कंपन्या आणि एनजीओ त्याला या कामासाठी मदत करत आहेत. सध्या हे अॅप इंग्रजीमध्ये असून येत्या काळात ५ भाषांमध्ये ही सेवा सुरू करण्यात येणार आहे. यामुळे कामगारांना एका जागेवरून दुसऱ्या जागी जाणं बंधनकारक असणार आहे. अॅपबद्दल माहिती देताना सोनू म्हणाला की, आमची एक वेबसाइट आणि एक अॅप आहे. तसेच अनेक लोक कामगारांना रजिस्ट्रेशनसाठी मदत करतील. आमचा हेल्पलाइन नंबरही आहे. लोक यावर फोन करून स्वतःही रजिस्टर करू शकतात. तुमची योग्यता सांगून तुम्हाला जे शिकायचं तेही तुम्ही सांगू शकता. आम्ही त्यांचं एक प्रोफाइल बनवू आणि त्यांना जे शिकायचं आहे त्याचं ट्रेनिंग देऊ आणि त्यांना चांगलं काम देणाऱ्यांपर्यंतही आम्ही पोहचवू. सध्या लोकांना माहीत नाहीये की त्यांना कधी काम मिळेल. जे कामाच्या शोधात आहेत त्यांनाही माहीत नाही की त्यांना कुठे काम मिळणार. लोकांना काम देण्याच्या या प्रयत्नात त्यांच्याकडून एकही रुपया घेतला जाणार नाही.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/30GOUFI