Full Width(True/False)

सर्वात स्वस्त Samsung Galaxy M01 Core भारतात लाँच

नवी दिल्लीः स्मार्टफोन भारतात लाँच करण्यात आला आहे. देशात लाँच करण्यात आलेला हा सर्वात स्वस्त स्मार्टफोन आहे. गॅलेक्सी एम ०१ कोर कंपनीच्या सध्याच्या एम०१ एस स्मार्टफोनच्या कॅटेगरीतील आहे. नवीन गॅलेक्सी एम०१ कोर कंपनीकडून गेल्या आठवड्यात इंडोनेशियात लाँच करण्यात आलेल्या गॅलेक्सी ए०१ कोरचा रिब्रँडेड व्हर्जन आहे. नवीन हँडसेटमध्ये गुगलचे अँड्रॉयड गो ऑपरेटिंग सिस्टम देण्यात आले आहे. वाचाः Samsung Galaxy M01 Coreची किंमत सॅमसंगच्या या फोनची किंमत सर्वात स्वस्त आहे. या फोनमध्ये डार्क मोड इंटिग्रेशन आणि इंटेलिजेंट इनपुट्स व इंटेलिजेंट फोटोज यासारखे फीचर्स देण्यात आले आहेत. या हँडसेटमध्ये ५.३ इंचाचा TFT डिस्प्ले आणि क्वाड-कोर मीडियाटेक 6739 प्रोसेसर दिला आहे. १ जीबी रॅम आणि २ जीबी रॅम अशा दोन पर्यायात फोन उपलब्ध आहे. इनबिल्ट स्टोरेजला मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने वाढवता येवू शकते. वाचाः गॅलेक्सी एम०१ कोर मध्ये ८ मेगापिक्सलचा सिंगल रियर कॅमेरा एलईडी फ्लॅश सोबत येतो. फ्रंटला ५ मेगापिक्सला सेल्फी कॅमेरा दिला आहे. कनेक्टिविटीसाठी फोनमध्ये वाय-फाय 802.11 ए/बी/जी/एन, ब्लूटूथ, जीपीएस/ए-जीपीएस, माइक्रो-यूएसबी आणि 3.5 एमएम हेडफोन जॅक यासारखे फीचर्स देण्यात आले आहे. फोनला पॉवर देण्यासाठी 3000mAh बॅटरी आहे. ११ तासांपर्यंत टॉक टाईम मिळण्याचा दावा आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3jKZeF1