नवी दिल्लीः रेडमीचा नवीन स्मार्टफोन आज भारतात लाँच करण्यात येणार आहे. कंपनी या फोनला आज दुपारी १२ वाजता लाँच करणार आहे. आज लाँचिंग कार्यक्रमात फोनची किंमत आणि भारतात याची उपलब्धेतेविषयी माहिती देण्यात येणार आहे. रेडमी नोट ९ चा ग्लोबल व्हेरियंट ३ जीबी आणि ४ जीबी रॅम ऑप्शन येतो. भारतात कोणत्या व्हेरियंट्समध्ये फोन लाँच करणार आहे, हे अवघ्या का तासांत समजणार आहे. वाचाः अधिकृत सोशल मीडिया हँडलवर पाहा लाइव्ह स्ट्रीमिंग रेडमी नोट ९ ला एक व्हर्च्यूअल इव्हेंट मध्ये लाँच करण्यात येणार आहे. या इव्हेंटचा लाईव्ह स्ट्रीमिंग आज दुपारी १२ वाजता यूट्यूब आणि Mi इंडियाच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर होणार आहे फोनची किंमत भारतात ग्लोबल व्हेरियंटच्या जवळपास असू शकते. रेडमी नोट ९ ला ग्लोबला व्हेरियंट जवळपास १५ हजार १०० रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आले होते. वाचाः रेडमी नोट ९ ची खास वैशिष्ट्ये रेडमी नोट ९ मध्ये ६.५३ इंचाचा FHD+ डिस्प्ले दिला आहे. डिस्प्लेच्या प्रोटेक्शनसाठी कॉर्निंग गोरिला ग्लास ५ आणि स्पलॅश नॅनो कोटिंग देण्यात आली आहे. सेल्फी कॅमेऱ्यासाठी यात डिस्प्लेच्या टॉप लेफ्ट कॉर्नरवर पंच होल देण्यात आला आहे. फोनमध्ये मीडियाटेक हीलियो G85 प्रोसेसर दिला आहे. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ४८ मेगापिक्सलचा क्वॉड रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. वाचाः रियर कॅमेऱ्यात ४८ मेगापिक्सलचा सेन्सर शिवाय ८ मेगापिक्सलचा वाइड अँगल कॅमेरा, २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आणि २ मेगापिक्सलचा मायक्रो लेन्स दिला आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये १३ मेगापिक्सलजा फ्रंट कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये फेस अनलॉक सुद्धा सपोर्ट करणार आहे. फोनला पॉवर देण्यासाठी 5020mAh बॅटरी दिली आहे. 18W फास्ट चार्जिंग सपोर्ट करते. या फोनमध्ये 3.5mm हेडफोन जॅक, NFC, IR ब्लास्टर आणि रियर मध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आले आहेत. फोनला रिव्हर्स चार्जिंग सपोर्ट सुद्धा देण्यात आला आहे. वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3eJ58TD