Full Width(True/False)

48MP कॅमेऱ्यासोबत येतोय मोटोरोलाचा स्वस्त स्मार्टफोन, जाणून घ्या डिटेल्स

नवी दिल्लीः मोटोरोला लवकरच आपला नवीन स्मार्टफोन लाँच करण्याची शक्यता आहे. गेल्या महिन्यापासून फोनचे वैशिष्ट्ये आणि फोटो लीक होत आहेत. बेंचमार्किंग वेबसाइट गीकबेंच लिस्टिंगवरून ही माहिती समोर आली आहे. या स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 460 प्रोसेसर दिला जावू शकतो. हा प्रोसेसर यावर्षी जानेवारीत आणला आहे. या फोनचे खास वैशिष्ट्ये म्हणजे हा फोन बजेट फ्रेंडली फोन आहे. आता प्रसिद्ध टिप्स्टर Evan Blass ने या फोनच्या वैशिष्ट्यांचा खुलासा केला आहे. वाचाः हे असतील फीचर्स एका लिक पोस्टरमध्ये या फोनच्या फीचर्स संदर्भात सांगितले आहे. या नुसार, या स्मार्टफोनमध्ये ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज सोबत क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ४० प्रोसेसर दिला जाणार आहे. फोन मध्ये 5,000mAh बॅटरी मिळणार आहे. वाचाः या फोनमध्ये ४८ मेगापिक्सलचा ड्यूल कॅमेरा सेटअप दिला जाणार आहे. हा कॅमेरा नाईट व्हर्जन सपोर्ट करणारा असणार आहे. कंपनीने गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात लाँच केलेल्या Moto E6 Plus चा हा फोन सक्सेसर मॉडल असणार आहे. वाचाः मोटो ई ७ ची डिझाईन या फोनमध्ये पुढच्या बाजुला वॉटर ड्रॉप नॉच डिस्प्ले दिला आहे. तर मागच्या बाजुला रियर कॅमेरा शिवाय फिंगरप्रिंट सेन्सर दिला आहे. खालच्या बाजुला यूएसबी टाईप सी पोर्ट, स्पीकर ग्रील आणि ३.५ एमएम हेडफोन जॅक मिळणार आहे. फोनची लाँचिंग कधी करण्यात येणार आहे, याविषयी कंपनीने अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही. परंतु, हा फोन पुढच्या महिन्यात म्हणजेच सप्टेंबर महिन्यात लाँच केला जावू शकतो. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/344LHCT