Full Width(True/False)

BSNL चे 50Mbps स्पीड सोबत ३ नवीन प्लान, हे आहेत फायदे

नवी दिल्लीः सरकारी टेलिकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेडने आपल्या ब्रॉडबँड ग्राहकांसाठी तीन नवीन ब्रॉडबँड प्लान आणले आहेत. बीएसएनएलने या प्लान अंतर्गत 50Mbps स्पीडचा डेटा युजर्संना मिळणार आहे. बीएसएनएलच्या या प्लानध्ये ग्राहकांना कॉलिंगची कोणतीही सुविधा देण्यात येणार नाही. तसेच हे तिन्ही प्लान सध्या केवळ पंजाब सर्कलसाठी उपलब्ध करण्यात आले आहेत. वाचाः BSNLने या प्लानची माहिती पंजाब सर्कलच्या वेबसाइटवर दिली आहे. या तिन्ही प्लानचे नाव 200GB CS111, 300GB CS112 आणि PUN 400GB आहेत. यात २०० जीबी बेसिक प्लान आहेत. या प्लानमध्ये ग्राहकांना ५० एमबीपीएस च्या स्पीडने २०० जीबी पर्यंत डेटा मिळणार असून याची वैधता एका महिन्याची आहे. डेटा संपल्यानंतर ही स्पीड ४ Mbps होईल. या प्लानची किंमत ४९० रुपये आहे. वाचाः 300GB CS112 प्लानची किंमत ५९० रुपये आहे. यात 50Mbps स्पीडचा डेटा युजर्संना मिळणार आहे. डेटा संपल्यानंतर ही स्पीड ४ Mbps होईल. या प्लानमध्ये एकूण ३०० जीबी डेटा मिळणार आहे. आता अखेरचा प्लान 400GB आहे. याची किंमत ६९० रुपये आहे. या प्लानमध्ये सुद्धा 50Mbps स्पीडचा डेटा युजर्संना मिळणार आहे. या तिन्ही प्लानमध्ये कॉलिंगची सुविधा देण्यात येत नाही. वाचाः बीएसएनएलने नुकताच ३९९ रुपयांचा एक प्रीपेड प्लान आणला आहे. या प्लानमध्ये तुम्हाला ८० दिवसांची वैधता मिळणार आहे. या प्लानमध्ये रोज २५० मिनिट कॉलिंग मिळेल. या प्लानमध्ये रोज १ जीबी डेटा मिळणार आहे. या प्लानमध्ये १०० एसएमएस रोज फ्री मिळणार आहे. हा प्लान १५ ऑगस्टपासून सुरू करण्यात आला आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3g0yMUP