नवी दिल्लीः शाओमीने भारतात आपला नवीन बजेट स्मार्टफोन रेडमी 9 () लाँच केला आहे. हा रेडमी ८ स्मार्टफोनचे अपग्रेड व्हर्जन आहे. १० हजार रुपयांच्या कमी किंमतीत हा फोन येतो. कंपनी फेस्टिव सीजनसाठी रेडमी ९ए सुद्धा घेऊन येवू शकते. जो चे व्हर्जन असणार आहे. नवीन स्मार्टफोन ४ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेज सोबत येतो यात नवीन ऑरेंज कलर ऑप्शन सुद्धा देण्यात आला आहे. वाचाः किंमत किती स्मार्टफोन दोन व्हेरियंट मध्ये येतो. 4GB रॅम + 64GB स्टोरेज मॉडलची किंमत ८ हजार ९९९ रुपये आहे. तर 4GB रॅम + 128GB स्टोरेज मॉडलची किंमत ९९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. फोनमध्ये कंपनीने ऑरो इज डिझाईन (Aura Edge Design)आणले आहे. हे तीन कलर ऑप्शन स्काय ब्लू, स्पोर्टी ऑरेंज आणि कार्बन ब्लॅक मध्ये येतो फोनची विक्री ३१ ऑगस्टपासून अॅमेझॉन इंडिया आणि Mi.com आणि Mi होम स्टोर्सवर सुरू होणार आहे. वाचाः रेडमी ९ स्मार्टफोनचे वैशिष्ट्ये या स्मार्टफोनमध्ये ६.५३ इंचाच HD+ IPS डिस्प्ले दिला आहे. याचा आस्पेक्ट रेशियो 20:9 आहे. डिस्प्ले नॉच आणि मागच्या बाजुला ड्यूल रियर कॅमेरा आणि फिंगरप्रिंट सेन्सर दिला आहे. स्मार्टफोनमध्ये 3.5mm चे हेडफोन जॅक दिला आहे. वाचाः स्मार्टफोन 4 जीबी च्या रॅम आणि 64GB/128GB स्टोरेज मध्ये येतो. स्टोरेज मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने वाढवता येवू शकतो. अँड्रॉयड १० आधारी MIUI 12 सोबत लाँच करण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी यात ड्यूल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. रियरमध्ये १३ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आणि २ मेगापिक्सलचा सेकंडरी सेन्सर दिला आहे. AI Scene Detection, Portrait Mode आणि Pro Mode देण्यात आले आहे. सेल्फीसाठी ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. स्मार्टफोनमध्ये 5000mAh बॅटरी दिली आहे. कंपनीचा दावा आहे की, बॅटरी दोन दिवसांपर्यंत बॅकअप देते. वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/32z9KHI