नवी दिल्लीः चीनची कंपनी रियलमीने आज भारतात आपले दोन स्मार्टफोन आणि लाँच केले आहेत. नवीन रियलमी स्मार्टफोनला देशात एकाच ऑनलाइन इव्हेंटमध्ये लाँच केले आहेत. कंपनीची सी सीरीजमध्ये रियलमी सी१ , रियलमी सी२, रियलमी सी ३ आणि रियलमी सी ११ नंतर आता रियलमी सी १५ आणि रियलमी सी १२ सीरीजचा समावेश करण्यात आला आहे. रियलमीचे हे दोन्ही हँडसेट्सला आधी इंडोनेशियात लाँच करण्यात आले होते. या दोन्ही फोनचे खास वैशिष्ट्ये म्हणजे यात 6000mAh ची बॅटरी दिली आहे. वाचाः Realme C15, Realme C12: ची किंमत रियलमी सी१५ च्या ३ जीबी रॅम प्लस ३२ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ९९९९ रुपये आहे. तर ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १० हजार ९९९ रुपये आहे. हा फोन पॉवर ब्लू आणि पॉवर सिल्वर कलरमध्ये लाँच करण्यात आले आहेत. फोनचा सेल २७ ऑगस्ट रोजी रियलमीची अधिकृत वेबसाईट आणि फ्लिपकापर्टवर सुरू होणार आहे. ३ सप्टेंबर पासून या फोनला देशातील मोठ्या रिटेल स्टोर्सवर उपलब्ध करण्यात येणार आहे. वाचाः रियलमी सी १२ च्या ३ जीबी प्लस३२ जीब इनबिल्ट स्टोरेजच्या व्हेरियंटची किंमत ८ हजार ९९९ रुपये आहे. हा फोन ब्लू आणि पॉवर सिल्वर कलरमध्ये मिळणार आहे. फोनची विक्री फ्लिपकार्ट आणि रियलमी डॉट कॉमवर २४ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता सुरू होणार आहे. ऑफलाइन रिटेल स्टोर्समधून फोन ३१ ऑगस्ट पासून खरेदी करता येवू शकतो. वाचाः वाचाः Realme C15 चे वैशिष्ट्ये रियलमीच्या या स्मार्टफोनमध्ये ६.५ इंचाचा मिनी-ड्रॉप (720x1,600 पिक्सल) डिस्प्ले दिला आहे. सुरक्षासाठी यात कॉर्निंग गोरीला ग्लास दिला आहे. ड्यूल सिमच्या या फोनमध्ये अँड्रॉयड १० बेस्ड रियलमी यूआय वर चालतो. फोनमध्ये ऑक्टा-कोर मीडियाटेक हीलियो जी ३५ प्रोसेसर आणि ग्राफिक्ससाठी GE8320 GPU दिला आहे. फोनमध्ये ३ जीबी आणि ४ जीबी रॅम उपलब्ध आहे. हँडसेटमध्ये ३२ जीबी व ६४ जीबी स्टोरेज पर्याय मिळतो. मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने हे वाढवता येवू शकते. वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3h7p4kV