नवी दिल्लीः संबंधी गेल्या काही दिवसांपासून लागोपाठ माहिती उघड होत आहे. सॅमसंगच्या या स्मार्टफोनला सप्टेंबर महिन्यात लाँच करण्याची शक्यता आहे. या हँडसेटला याआधीच अमेरिकेतील फेडरल कम्यूनिकेशन्स कमिशन (FCC) सर्टिफिकेशन वेबसाइट आणि ब्लूटूथ SIG अथॉरिटी वर लिस्ट करण्यात आलेले आहे. आता गॅलेक्सी एम ५१ चे सपोर्ट पेज सॅमसंग च्या रशियाच्या वेबसाइटवर पाहिले गेले आहे. त्यावरुन माहिती होत आहे की, सॅमसंग गॅलेक्सी एम५१ वरून लवकरच पडदा हटवला जावू शकतो. वाचाः सॅमसंगच्या वेबसाइटवर गॅलेक्सी एम५१ चा स्पष्ट उल्लेख करण्यात आला नाही. परंतु, या हँडसेटचे मॉडल नंबर SM-M515F / DSN मॉडल आहे. सपोर्ट पेजवर फोनच्या वैशिष्ट्यांविषयी काही माहिती नाही. वाचाः Samsung Galaxy M51: संभावित वैशिष्ट्ये सॅमसंग गॅलेक्सी एम ५१ मध्ये ६.५ इंचाचा फुल एचडी प्लस रिझॉल्यूशन स्क्रीन आहे. फोनमध्ये पंच होल डिझाईन असणार आहे. फोनच्या स्क्रीनमध्ये इंटिग्रेटेड फिंगरप्रिंट रिडर असू शकते. सॅमसंगच्या या फोनमध्ये लेटेस्ट वन आय यूआय व्हर्जन सोबत अँड्रॉयड १० ओएस असू शकतो. वाचाः हँडसेटमध्ये स्नॅपड्रॅगन 730G मोबाइल प्लॅटफॉर्म आणि ८ जीबी रॅम दिला जावू शकतो. फोनमध्ये १२८ जीबी इनबिल्ट स्टोरेज असू शकतो. मिळत असलेल्या माहितीनुसार, गॅलेक्सी एम५१ मध्ये 7000mAh ची मोठी बॅटरी असणार आहे. ही बॅटरी २५ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट सोबत येवू शकते. हँडसेटमध्ये रियरवर क्वॉड कॅमेरा सेटअप दिला जाण्याची शक्यता आहे. स्मार्टफोनमध्ये ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी आणि १२ मेगापिक्सलचा अल्टा वाइड सेन्सरचा ड्यूल रियर कॅमेरा सेटअप दिला जावू शकतो. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3kzpZN5