नवी दिल्लीः स्मार्टफोन कंपनी रियलमीकडून यावर्षी लाँच करण्यात आलेली रियरमी नार्जो सीरीज खूप प्रसिद्ध झाली. या सीरीज अंतर्गत दोन स्मार्टफोन लाँच करण्यात आले होते. आणि Realme Narzo 10A या दोन स्मार्टफोनपैकी जास्त पॉवरफुल असलेल्या Realme Narzo 10 चा आज सेल आयोजित करण्यात आला आहे. या फ्लॅश सेलमध्ये MediaTek Helio G80 प्रोसेसर सोबत येतो. आज दुपारी १२ वाजता फ्लिपकार्ट आणि रियलमीची अधिकृत वेबसाईटवरून हा फोन खरेदी करता येवू शकतो. वाचाः Realme Narzo 10 चे वैशिष्ट्ये Realme Narzo 10 मध्ये ६.५ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. याचे रिझॉल्यूशन 720x1,600 पिक्सल आहे. फोनमध्ये मीडियाटेक हीलियो जी80 प्रोसेसर दिला आहे. हा फोन एक ड्यूल सिम स्मार्टफोन आहे. या फोनची इंटरनल स्टोरेज मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने २५६ जीबी पर्यंत वाढवता येवू शकते. यात कनेक्टिविटीसाठी 4जी वीओएलटीई, 3जी, वाय-फाय, ब्लूटूथ, जीपीएस आणि यूएसबी टाइप-सी यासारखे कनेक्टिविटी फीचर्स देण्यात आले आहे. वाचाः फोटोग्राफीसाठी रियलमी नार्जो १० मध्ये ४८ मेगापिक्सलचा क्वॉड रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. रियर कॅमेऱ्यात ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड सेन्सर, २ मेगापिक्सलचा मायक्रो आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला आहे. सेल्फी आण व्हिडिओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. वाचाः Realme Narzo 10 ची किंमत आणि ऑफर्स भारतात Realme Narzo 10किंमत ११ हजार ९९९ रुपये आहे. ही किंमत फोनच्या ४ जीबी रॅम मॉडलची आहे. MobiKwik यूजर्स ला या फोन खरेदीवर ५०० रुपयांपर्यंत डिस्काउंट ऑफर केली जात आहे. फ्लिपकार्टवर Axis Bank Buzz क्रेडिट कार्डधारकांना ५ टक्के डिस्काउंट दिला जात आहे. वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3aeqd7D