Full Width(True/False)

फोनमध्ये फास्ट चार्जिंग, AI सपोर्ट आहे?, मग तुम्ही हॅकर्सच्या हिटलिस्टवर

नवी दिल्लीः तुम्ही कधी डिजिटल सिग्नल प्रोसेसरचे नाव ऐकले आहे का?, ऐकले नसेल तर याच्या मदतीने फोनवर मिळणाऱ्या फीचर्सचा वापर नक्कीच करीत असाल. या प्रोसेसरला सिंगल चिपमध्ये कंप्लीट कम्प्यूटर म्हटले जाते. याच्या मदतीने फोनमध्ये टेक्नोलॉजी किंवा ऑगर्मेंटेड रिअॅलिटी यासारखे फीचर्स मिळतात. परंतु, याच चिपमुळे हॅकर्ससाठी एखाद्याला लक्ष्य करणे सोपे झाले आहे. वाचाः सायबर सिक्यॉरिटी फर्म Check Point च्या रिसर्चर्स ने म्हटले आहे की, चिपच्या वाइड रेंजमध्ये काही तरी कमतरता आहे. त्याचा हॅकर्स गैरफायदा घेऊ शकतात. रिसर्चर्स मक्कावीव यांनी सांगितल्याप्रमाणे या प्रोसेसर अटॅकर्स साठी गेटवे बनू शकतात. तसेच हॅकर्सला पूर्ण अँड्रॉयड डिव्हाईसेजचे कंट्रोल मिळू शकते. वाचाः क्वॉलकॉमला मोठे आव्हान रिसर्चर ने क्वालकॉम स्नॅपड्रॅगन चिप वर रिचर्स मध्ये दिसले की ४० टक्क्यांहून अधिक अँड्रॉयड डिव्हाईसमध्ये वापर करणाऱ्या या चिपमध्ये ४०० हून अधिक कमतरता आणि सिक्योरिटी फ्लॉ आहेत. कोणीही हॅकर खास करून अॅप्स डिझाईन करुन या चिपमध्ये सध्याच्या कमतरतेचा फायदा उचलू शकतात. ज्यावरून सध्याच्या सिक्योरिटी चेकपॉइंट्सला बायपास केले जावू शकते. वाचाः कॉल रेकॉर्डिंग पर्यंत शक्य या कमतरतेचा फायदा उचलून हॅकर्स डेटा चोरी करु शकतात. तसेच फोटो - व्हिडिओ आणि लोकेशन संबंधित माहिती स्पष्ट करु शकतात. या कमीमुळे कोणीही मॅलिशस अॅप कॉल रेकॉर्ड करु शकतात. किंवा मायक्रोफोनच्या मदतीने हेरगीरी करु शकतात. क्वॉलकॉम कडून कमतरता समोर आल्यानंतर इशारा दिला आहे. फोन बनवणाऱ्या कंपनीकडून अपडेट देऊन या कमतरता दूर केल्या जावू शकतात. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3kt2RQH