मुंबई- सुशांतसिंह राजपूतच्या डायरीच्या छेडछाड प्रकरणी अनेक नवनवीन खुलासे होत आहेत. मीडियाला मिळालेल्या त्याच्या पर्सनल डायरीची काही पानं गायब आहेत. सुशांतच्या चुलत भावानेही सांगितले की पोलिसांनी त्याची पर्सनल डायरी घेतली होती पण ते यासोबत छेडछाड करतील असं कधी वाटलं नव्हतं. यासोबतच सुशांतचा फ्लॅटमेट याच्या दोन वेगवेगळ्या जबाबांनी या प्रकरणाची गुंतागुंत अजून वाढली आहे. सुशांतच्या डायरीची सहा पानं गायब आहेत. सिद्धार्थ म्हणाला कोणतंही पान फाटलेलं नव्हतं सुशांतच्या मृत्यूची गुंतागुंत सतत वाढत आहे. बिहार पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी नव्याने सुरू केली होती. पण आता हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आलं आहे. टाइम्स नाउला सुशांतची पर्सनल डायरी मिळाली. असं म्हटलं जातं की, या डायरीतील काही पानं फाडलेली होती. यावर सुशांतचा चुलत भाऊ नीरज कुमार बबलू म्हणाला की, त्याला डायरी लिहायची सवय होती. माझ्यासमोरच पोलिसांनी त्याच्या ४- ५ डायरी घरून नेल्या होत्या. सुरुवातीला मला वाटलं चौकशीसाठी ही चांगली गोष्ट आहे. पण मला वाटलं नव्हतं की, पुराव्यांची छेडछाड करण्यात येईल आणि मुंबई पोलिसांचा एक वेगळा चेहरा देशासमोर येईल. सिद्धार्थ पिठानीचे दोन वेगवेगळे जबाब सुशांतच्या डायरीची पानं फाटल्याचे कळल्यानंतर सिद्धार्थने दोन वेगवेगळे जबाब दिले. ज्यामुळे नक्की खरं काय ते कळू शकले नाही. सिद्धार्थने सुरुवातीला सांगितलं की सुशांतच्या डायरीची पानं फाटली नव्हती. यानंतरच्या जबाबात त्याने म्हटलं की, सुशांत अनेकदा स्वतःचं पानं फाडायचा. सुशांतच्या मित्राने व्यक्त केला संदेह सुशांतचा मित्र नीलोत्पल मृणालच्या मते, फाडलेल्या पानांची चौकशी होणं गरजेचं आहे. रिया नक्कीच काहीतरी लपवत आहे. तो म्हणाला की, कोणी काहीही लिहू शकतं आणि काहीही लपवू शकतं. डायरीवरचे बोटांचे ठसे मिटवले जाऊ शकत नाहीत, त्यामुळे ठश्यांचीही तपासणी केली गेली पाहिजे. पिठानीने पोलिसांना दिले मेसेज सिद्धार्थने त्या पुराव्यांबद्दलही सांगितले जे मुंबई पोलिसांना देण्यात आले आहेत. यात चावीवाल्याला केलेल्या मेसेजपासून अनेक गोष्टींचा समावेश आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2Px9TWa