Full Width(True/False)

कोण आहे AU रियाने ६३ वेळा केले कॉल, प्रकरणाला नवं वळण

मुंबई- बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणात दर दिवशी नवनवीन खुलासे होत आहेत. यात आता रिया चक्रवर्तीशी निगडीत नवीन अपडेट समोर आली आहे. असं म्हटलं जातं की, रिया आणि यांच्याच जवळपास ६३ कॉल झाले होते. सुशांतच्या केसमध्ये या गोष्टी संदिग्ध दिसत आहेत. कोण आहे AU रियाच्या टीमने याचं स्पष्टीकरण देताना स्पष्ट केलं की, ज्या AU चा उल्लेख केला जात आहे ती रियाची फॅमिली फ्रेण्ड आहे. मात्र रिया आणि अनन्या यांच्यात एवढे फोन का झाले हे अजून स्पष्ट झाले नाही. न्यायालयात झाली मोठी चर्चा मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुशांतच्या केसचा तपास मुंबई पोलीस करणार की सीबीआय यावर मोठी चर्चा झाली. या प्रकरणावर गुरुवारी निर्णय होऊ शकतो. दरम्यान, सुशांतच्या वडिलांनी केके सिंह यांनी पटणात रियासह तिच्या कुटुंबियांवर आणि अन्य दोन जणांवर सुशांतला आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्याप्रकरणी एफआयआर दाखल केली आहे. यावर रियाने ही केस पटणातून मुंबईत ट्रान्सफर करण्यात यावी यासाठी याचिका दाखल केली होती. दरम्यान, सुशांतच्या वडिलांनी रिया चक्रवर्तीवर सुशांतला आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्याचा आरोप केला आहे. या प्रकरणाची सीबीआय चौकशीही सुरू आहे. तसेच मनी लॉण्ड्रिंगच्या प्रकरणात ईडीही चौकशी करत आहे. सुशांतच्या घरातल्यांच्या मते, सुशांत आजारी होता याची त्यांना कल्पनाच नव्हती. त्यांना कधी याबद्दल सांगण्यातही आलं नाही. रियाने कुटुंबियांना सांगितलं पाहिजे होतं.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2DVryEx