नवी दिल्लीः चीनची कंपनी शाओमीने ११ ऑगस्ट रोजी एकत्र अनेक स्मार्टफोन आणले आहेत. जबरदस्त फीचर्स असलेला Mi 10 सीरीज शिवाय कंपनी ने स्मार्टफोन लाँच केला आहे. हा मिड रेंज प्राईसचा फ्लॅगशिप स्मार्टफोन आहे. ज्यात फुल स्क्रीन डिस्प्ले, पॉप अप सेल्फी कॅमेरा आणि ५ जी प्रोसेसर यासारखे फीचर्स देण्यात आले आहेत. चीनमध्ये या फोनची किंमत १९९९ चिनी युआन (२१ हजार ५०० रुपये) आहे. वाचाः व्हेरियंट आणि किंमत या फोनला चार व्हेरियंटमध्ये लाँच करण्यात आले आहे. 6GB + 128GB मॉडलची किंमत २१ हजार ५०० रुपये, 8GB + 128GB मॉडलची किंमत २३ हजार ६०० रुपये, 8GB + 256GB मॉडलची किंमत २६ हजार ८०० रुपये, आणि 8GB + 512GB मॉडलची किंमत २९ हजार रुपये ठेवण्यात आली आहे. या स्मार्टफोनची चायनीज मार्केटमध्ये १६ ऑगस्टपासून विक्री करण्यात येणार आहे. वाचाः डिझाईनमध्ये या फोनला फुल स्क्रीन डिझाईन आणि पॉप अप सेल्फी कॅमेरा दिला आहे. या सीरीजच्या जुन्या मॉडलची आठवण करून देणारा आहे. यात ६.६७ इंचाचा अमोलेड स्क्रीन दिली आहे. 120Hz रिफ्रेश रेट आणि HDR10+ सपोर्ट करते. फोनमध्ये ८ जीबी रॅम पर्यंत आणि ५१२ जीबी पर्यंत स्टोरेज दिला आहे. यात मीडियाटेक डायमेंसिटी 1000+ प्रोसेसर दिला आहे. हा एक ५ जी स्मार्टफोन आहे. जो ड्यूल सिम ५ जी सपोर्ट करतो. वाचाः फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ६४ मेगापिक्सलचा क्वॉड रियर कॅमेरा दिला आहे. रियर कॅमेऱ्यात ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, १३ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स, ५ मेगापिक्सलचा मायक्रो आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला आहे. सेल्फीसाठी २० मेगापिक्सलचा पॉप अप सेल्फी कॅमेरा दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी 4500mAh बॅटरी दिली आहे. जी 33W फास्ट चार्जिंग सपोर्ट करते. हा फोन एका तासात फुल चार्ज होत असल्याचा कंपनीचा दावा आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3kxPj6t