Full Width(True/False)

WhatsApp स्टीकर्सने द्या जन्माष्टमीच्या शुभेच्छा

नवी दिल्लीः चॅटिंगला मजेदार बनवण्यासाठी व्हॉट्सअॅप नवीन-नवीन फीचर्स एका पाठोपाठ आणत असते. कंपनीने अँड्रॉयड आणि आयओएस दोन्ही युजर्संसाठी व्हॉट्सअॅप स्टीकर्स रोलआउट करणे सुरू केले आहे. तसेच हे नवीन अॅनिमिटेड स्टीकर्स या अॅप स्टीकर्स स्टोर्सवर रेग्यूलर स्टीकर पॅक सोबत दिसतील. यात स्वीट लाईफ, मूडी फुड्स आदी स्टीकर्सला इन्स्टॉल करु शकतात. सण, उत्सवावर शुभेच्छा देण्यासाठी स्टीकर पेक्षा आणखी दुसरे काही चांगले नाही. त्यामुळे तुम्हाला जर जन्माष्टमीनिमित्त आपल्या मित्रांना, कुटुंबातील व्यक्तीना या खास स्टीकरवरून खास शुभेच्छा देता येवू शकतात. वाचाः आज जन्माष्टमी आज १२ ऑगस्ट रोजी श्रीकृष्णांच्या जन्म उत्सव साजरा करण्यासाठी कृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाते. त्यामुळे आज तुम्हाला जन्माष्टमी निमित्त आपल्या मित्र-मैत्रिणींना, नातलगांना शुभेच्छा द्यायच्या असतील तर कस्टम मेड व्हॉट्सअॅप स्टीकर शेयर करा. तसेच क्रिएट करू शकतात. वाचाः असे क्रिएट करा स्टीकर >> यासाठी सर्वात आधी तुम्हाला तुमच्या अँड्रॉयड किंवा iOS फोनमधील व्हॉट्सअॅपच्या बॅकग्राउंड एरेजर आणि स्टीकर मेकर अॅप डाउनलोड करावा लागेल. >> त्यानंतर गॅलरीमधून एक इमेज सिलेक्ट करा किंवा आपल्या व्हॉट्सअॅपला स्टीकर बनवण्यासाठी फोटो कॅप्चर करा. >> आता बॅकग्राउंडला इरेजर अॅपवर जा. तसेच फोटोला PNG मध्ये सेव्ह करा. >> स्टीकर मेकर अॅपवर जा. तुम्ही बनवलेल्या स्टीकरला जोडण्यासाठी '+' याच्यावर टॅप करा. >> या स्टीकरला आपल्या व्हॉट्सअॅप कॉन्टॅक्टमध्ये शेयर करा. वाचाः जर तुम्हाला व्हॉट्सअॅप साठी आधीच जन्माष्टमी स्टीकर डाउनलोड करायचे असल्यास तुम्हाला व्हॉट्सअॅप चॅट उघडावी लागेल. त्यानंतर इमोजी बटनावर टॅप करून आणि त्यानंतर व्हॉट्सअॅप स्टिकरसाठी तिसऱ्या आयकॉनला सिलेक्ट करू शकता. आता अधिक स्टीकर जोडण्यासाठी '+' वर क्लिक करा. त्यानंतर खाली स्क्रॉल करा आणि गेट मोर स्टिकरवर टॅप करा. त्यानंतर गुगल प्ले स्टोरवर जा. या ठिकाणी जन्माष्टमीसाठीचे अनेक व्हॉट्सअॅप स्टीकर अॅप मिळतील. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3iK7Jzd