मुंबई: मराठी सिनेसृष्टीतला अभिनेता आणि '' फेम अभिनेत्री हिचा पती यानं आत्महत्या केल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला होता. डिप्रेशनमुळेच त्यानं इतकं टोकाचं पाऊल उचललं असल्याचं आता समोर आलं आहे. आशुतोषच्या अचानक जाण्यानं त्याच्या कुटुंबियांना देखील मोठा धक्का बसला असून मयुरी या धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न करतेय. मयुरीनं एक पोस्ट शेअर करत तिच्या भावना व्यक्त केल्या आहे. काल म्हणजेच ११ ऑगस्ट रोजी आशुषोत त्याचा ३० वा वाढदिवस साजरा करणार होता. त्यापूर्वीच त्यानं जगाचा निरोप घेतला. या दिवशी झालेल्या वेदना मयुरीनं तिच्या इन्स्टाग्रामपोस्टमध्ये व्यक्त केल्या आहेत. काय म्हटलंय मुयरीनं या पोस्टमध्ये? 'आशुडा, तुझ्या वाढदिवसाला मला छान केक बनवायचा होता, म्हणून या लॉकडाऊनमध्ये मी ३० केक बनवले होते. त्या तीसही केकची सर्वांत आधी तू चव चाखली होतीस.तुला ३० वा वाढदिवस असा साजरा करायचा होता का? तुझ्यावर प्रेम करणाऱ्यांसाठी तू अनेक प्रश्न सोडून गेला आहेस. आम्हाला हे देखील माहित आहे की, तू भ्याडपणातून नाही, तर तुझ्या डिप्रेशनसोबत लढण्याच्या असहाय्यतेमुळं हे पाऊल उचललं आहेस. आपण ही नैराश्याची लढाई जिंकणारच होतो. पण तू सोडून गेलास. प्रत्येक दिवशी... प्रत्येक क्षणाला वाटायचं की, आणखी थोडा धीर आणि संयम...मग तुझ्यासमोर एक आनंदी आणि निरोगी आयुष्य वाट पाहतंय. तू मला आयुष्याच्या अर्ध्या वाटेत सोडून गेलास म्हणून तुझ्यावर रागवायचं की, तुझ्यासोबत जे आयुष्य घालवता आलं त्यासाठी देवाचे आभार मानायचे मी, पण आता काय फरक पडतो', असं म्हणत मयुरीनं तिच्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. बायको तुझी नवसाची आशुतोष मयुरीसोबत फोटो शेअर करताना नेहमी एक हॅशटॅग लिहायचा. तो म्हणजे #बायकोमाझीनवसाची #Baykomajhinavsachi. त्यामुळं त्याच्या आठवणीत मयुरीनं देखील #Baykotujhinavsachi असा हॅशटॅग लिहिला आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/30OqF9L