हॅकर्स सामान्य लोकांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी वेगवेगळी पद्धत अवलंबत असतात. ज्यांना ऑनलाइनची जास्त माहिती नाही. अशा लोकांना संपर्क करून त्यांचा आयडी आणि मोबाइल नंबरवर हॅक करणारी लिंक पाठवत असतात. लिंक पाठवल्यानंतर त्यांना फोन करून 'नो योर कस्टमर' (KYC) पूर्ण करायची आहे. त्यामुळे तुम्हाला जे सांगितले जाईल. ते करा. असे खोटे बोलतात. जर तुम्ही असे केले नाही तर तुमचे अकाउंट ब्लॉक करण्यात येईल, असेही ते लोकांना सांगत असतात. मोबाइल नंबर किंवा लिंक पाठवून त्या नंबरवर कॉल करण्यास सांगितले जाते. किंवा लिंक ओपन करायला भाग पाडले जाते. लिंक क्लिक करताच त्यातील माहिती हॅक करुन हॅकर्स आपले इप्सित साध्य करतात. त्यामुळे कोणत्याही अज्ञात फोनवर कॉल करणे टाळावे, तसेच अज्ञात लिंक ओपन करु नये. असे केल्यास आपले आर्थिक नुकसान होण्याची भीती असते.

केवायसी संबंधी फ्रॉडचे अतिरिक्त ग्राहकांना अन्य धोक्यांपासून सावध राहायला हवे. ईएमआय स्थगन आणि यूपीआय संबंधी फ्रॉड सर्वात जास्त फसवणुकीला कारण ठरत असतात. कोटक महिंद्रा बँकेत प्रोडक्टस, ऑल्टरनेट चॅनेल्स व कस्टमर एक्सपिरियन्स डिलिव्हरीचे अध्यक्ष पुनीत कपूर यांनी सांगितले की, आज ग्राहकांकडे ऑनलाइन बँकिंग साठी खूप सारे टूल्स उपलब्ध आहे. यामुळे घरी बसून सोप्या आणि सुरक्षित पद्धतीने विविध प्रकारे देवाण-घेवाण करणे शक्य होणार आहे. परंतु, यासोबतच सायबर गुन्हेगारीची ऑनलाइन धोकेबाजी सुद्धा वाढली आहे. आपल्या ग्राहकांनी सतर्कता म्हणून पाहायला हवे. काही सावधगीरी बाळगल्यास आपण सुरक्षित राहू शकतो.

आपले सीआरएन, पासवर्ड, कार्डची माहिती, सीव्हीव्ही, ओटीपी, एटीएम पिन, यूपीआय पिन, मोबाइल बँकिंग पिन सारखी संवेदनशील माहिती कधीही कुणालाही शेयर करु नका. केवळ विश्वसनीय सूत्रांची माहितीच्या लिंकवर क्लिक करा. जर कधी तुम्हाला अज्ञात व्यक्तीने ई-मेल किंवा टेक्स्ट मेसेज आल्यास किंवा टेक्स्ट मेसेज आल्यास संबंधित लिंकवर क्लिक करु नका. क्लिक करताना दोनदा विचार करा. क्लिक केल्यानंतर तुमचे आर्थिक नुकसान तर होणार नाही ना. याची पुरेपूर काळजी घ्या. त्या संशयित लिंकला डिलीट करा. कोणत्याही धमकीवर काहीही प्रतिक्रिया देऊ नका. लॉटली लागली असे कोणी बोलले तर त्यावर विश्वास ठेवू नका. बँक कधीही असे मेसेज पाठवत नाही.

आपल्या मनात संशयीत वस्तू आढळल्यास किंवा कुणी अनोळखी व्यक्तीने आपल्या ईमेल आयडीवर लिंक पाठवल्यास त्याला तात्काळ उत्तर देऊ नका. स्क्रीन शेयरिंग अॅप्स जसे एनीडेस्क, टीमव्ह्यूअर आदी डाउनलोड करु नका. असे केल्यास तुमच्या मोबाइलचा, लॅपटॉपचा किंवा कम्प्यूटरचा अॅक्सेस चुकीच्या हातात पडण्याची शक्यता आहे. यावरून तुमची आर्थिक फसवणूक केली जावू शकते. तुमचा मोबाइल, लॅपटॉपवर नियंत्रण मिळवता येवू शकते. तुमच्या बँक खात्याला नुकसान पोहोचू शकते.

यूपीआय वरून पैसे मिळवण्यासाठी क्यूआर कोड स्कॅन करणे किंवा पिन ओटीपी एन्टर करण्याची गरज नाही. बँकिंग ट्रान्झॅक्शनवर तात्काळ अपडेट मिळवण्यासाठी आपला एसएमएस आणि ईमेल सुविधा अॅक्टिव कार. ट्रान्झॅक्शन मेसेज आणि पॉप अपची तपासणी करा. आपली कॉन्टॅक्ट डिटेल्स बँक जवळ अपडेट राखा. बँकेशी संपर्क करण्यासाठी नेहमी बँकेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. नेहमी सॉफ्टवेअर अपडेट करा. तसेच आपल्या सिस्टममध्ये एक चांगला अँटी व्हॉयरस सॉफ्टवेयर इन्स्टॉल करा.



from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3fRbEbi