नवी दिल्लीः टेक्नोलॉजीच्या जगात मुलांसाठी सुद्धा नवीन डिव्हाइसेज आणि गॅझेट्स कंपन्या आणत आहे. टेक कंपनी शाओमीने आता मुलांसाठी लाँच केली आहे. चीनमध्ये या स्मार्टवॉचची किंमत शाओमीने ५४९ चिनी युआन म्हणजे जवळपास ५ हजार ९०० रुपये ठेवली आहे. या व्हियरेबल मध्ये VoLTE HD कॉल्सचे सपोर्ट २०० हून अधिक देशात दिले आहे. तसेच यात ड्यूल कॅमेरा दिला आहे. वाचाः शाओमीच्या या खास वॉचची ७ दिवसांची बॅटरी लाईफ देते. तसेच २० मीटर पर्यंत वॉटर रेसिस्टेंस सुद्धा ऑफर करते. MiTu Kids Watch 4X मध्ये १.५२ इंचाचा चौकोणी डिस्प्ले गोरिला ग्लास ३ चे प्रोटेक्शन सोबत दिले आहे. यावर खास कोटिंगचा स्मज फ्री एक्सपिरियन्स ऑफर करतो. या व्हियरेबलचे स्ट्रॅप सिलिकॉनने बनवले आहे. याला दोन कलर पर्याय ब्लू आणि पिंक मध्ये खरेदी करता येवू शकते. वाचाः GPS ने होणार ट्रॅकिंग वॉच २०० हून अधिक देशात 4G नेटवर्क वर VoLTE HD कॉल्स सपोर्ट करते. यात GPS सुद्धा देण्यात आला आहे. याच्या मदतीने पालक आपल्या मुलांना सहज अँड्रॉयड फोन किंवा आयफोनच्या मदतीने ट्रॅक करु शकतात. तसेच स्मार्टवॉच मध्ये इमरजन्सी परिस्थितीत वापरले जाणारे एसओएस फंक्शन सुद्धा दिले आहे. या व्हियरेबल Xiao AI असिस्टेंट, डिक्शनरी अॅप आणि इंग्लिश कोचिंग अॅप सुद्धा देण्यात आले आहे. वाचाः दोन कॅमेरे पालक या व्हियरेबल स्मार्टवॉचमध्ये आणखी एज्युकेशन अॅप्स इन्स्टॉल करू शकतात. वॉच मध्ये व्हिडिओ कॉलिंग आणि मुलांसाठी सेफ्टी साठी दोन कॅमेरे दिले आहेत. पहिला फ्रंट फेसिंग कॅमेरा २ मेगापिक्सलचा आणि दुसरा साइड माउंटेड सेन्सर ५ मेगापिक्सलचा आहे. मुलांसाठी यात देण्यात आलेला AI गूगल लेंस ने फोटो क्लिक करणे शिकू शकतात. यात 830mAh ची बॅटरी दिली आहे. जी ७ दिवसांपर्यंत चालते. वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3kGbVll